आलापल्ली येथे आदिवासी सांस्कृतिक समाज भवनाच्या बांधकामांचे जि. प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

आलापल्ली, दि. १८ मे : आलापल्ली येथिल श्रीराम चौकात आदिवासी सांस्कृतिक समाज भवनाच्या बांधकामांचे जि. प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.

आदिवासी समाजाच्या सांस्कृतीक तथा परंपरागत रूढी परंपरा, चालीरीती यांची जोपासना करण्यासाठी व समाजाचे कार्यक्रम घेण्यासाठी समाजभवन नसल्याने आदिवासी बांधवाना अडचण होत होती.

आलापल्ली येथे आदिवासी उत्सव समितीची जागा उपलब्ध असल्याने या जागेवर सांस्कृतिक समाजभवन उभारून दिल्यास समाजाचे कार्यक्रम घेण्यास सोईचे होईल व समाजाच्या सांस्कृतीक विकासालाही चालना मिळेल.

या उद्देशाने आदिवासी उत्सव समितीने जि. प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांना ७ फेब्रुवारी ला  निवेदन देवून समाज भवनाची मागणी केली होती. निवेदन स्वीकारताना शब्द दिले आहे कि, आपण नेहमीच सर्व समाजाला मदत करत आले असून आलापल्ली  येथे  आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात असल्याने समाज भवन आवश्यक असून मी  शब्द देतो कि येत्या काही दिवसांतच समाज भवनासाठी निधी उपलब्ध करून देऊ असे आश्वासन दिले होते.

जिल्हा परिषदेच्या निधीतून समाज भवनासाठी १५ लाखांचा निधी मंजूर केला असुन समाज भवनाच्या बांधकामाचे भूमिपूजन जि. प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आले आहे.

यावेळी आलापल्लीचे सरपंच शंकर मेश्राम, ग्रा. पं. सदस्य तथा माजी सरपंच विजय कुसनाके  माजी सरपंच, दिलीप गंजीवार, सुगंधा मडावी माजी सरपंच, पुष्पलता जगताप सदस्य, रमेश मडावी, व्येकटी मडावी, चंद्रकांत बेझलवार, बंडू आत्राम, महेश सडमेक, प्रशांत गोडशेलवार आविस शहर अध्यक्ष अहेरी, सुधीर मडावी, जुलेख शेख, जुनेद शेख, रहीम भाई, नॉनुरवार आगंनवाड़ी सेविका आलापल्ली व आविसच्या पदाधिकाऱ्याची उपस्थिती होती.

हे देखील वाचा :

छत्तीसगडमधील CRPF जवान आणि आदिवासींमध्ये संघर्ष, 3 जणांचा मृत्यू

बळजबरी करण्याऱ्या बापाचा मुलीनं केली हत्या

हजारो रुग्णांवर उपचार करणारे प्रसिद्ध डॉक्टरचं कोरोनानं निधन

 

ajay kankadalwarlead storyShankar MeshramVijay Kusnake