भिमपूर ते कोरची सिमेंट रस्त्याचे बांधकाम निक्रुष्ठ दर्जाचे

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

कोरची दि.२६ डिसेंबर :- एक महिन्यापूर्वी भिमपूर ते कोरची दरम्यान सिमेंट रस्त्याचे बांधकाम झाले असून हे बांधकाम अत्यंत निक्रुष्ठ दर्जाचे आहे. भिमपूर ते कोरची या मार्गाने महाराष्ट्रातून छत्तीसगढ राज्यात जड वाहने नेहमीच जात असतात. त्यामुळे हा रस्ता पूर्णपणे उखडला जातो. पावसाळ्यात या रस्त्याने साध्या वाहनाने जाने अवघड  होत असते. त्यामुळे हा मार्ग पक्का व्हावा अशी लोकांची अनेक दिवसांपासून मागणी होती आणि या मागणीची शासनाने दखल घेत या मार्गावर सिमेंट रस्ता तयार करण्यासाठी कार्यवाही केली. त्यानुसार पीसीसी कंपनीने बांधकामाचा कंत्राट घेऊन अवघ्या काही दिवसात हा सिमेंट रस्ता तयार केला असून जून्याच  रस्त्यावरील माती बाजूला काढून तिच माती पुन्हा बांधकामात वापरण्यात आली. सिमेंट आणि रेतीचे योग्य प्रमाणात मिश्रण केले नाही. रस्ता समतल न करता खाचखडगे तसेच आहेत.या शिवाय  स्त्याच्या कडेला मुरूम न टाकता माती टाकली आहे.वेळोवेळी नागरिकांनी  रस्त्याचे बांधकाम निक्रुष्ठ दर्जाचे झाले आहे.ते दुरुस्त करण्यात यावे अशी मागणी केली मात्र प्रशासनांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिक गावकर्यांचा आहे .