चापलवाडा मछली येथील कोल्हापुरी बंधाऱ्याचे बांधकाम निकृष्ट

– कोल्हापुरी बंधाऱ्याचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याचे चापलवाडा मछली येथील गावकऱ्यांचा आरोप

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

आष्टी प्रतिनिधी – निशिकांत भासारकर

आष्टी, दि. २९ एप्रिल: जलसंधारण सिंचाई विभागामार्फत राज्यभरात शेतीसाठी जलसिंचनाची सोय व्हावी यासाठी कोल्हापुरी पद्धतीचे बंधाऱ्याची निर्मिती करण्यात येत आहेत. चामोर्शी तालुक्यात असलेल्या चापलवाडा मछली येथील गावानजीक असलेल्या नाल्यावर कोल्हापुरी बंधाऱ्याची निर्मिती करण्यात येत आहे. परंतु नाल्यावर कोल्हापुरी पद्धतीचे बांधकाम होत असल्याचे दिसत असले तरी अंदाजपत्रक व ठरवलेल्या करारानुसार न होता, सदर बांधकाम निकृष्ट दर्जाचा मटेरियल वापरून कंत्राटदार हे बांधकामात आर्थिक लाभ अधिक मिळवण्यासाठी निकृष्ट दर्जाचे कोल्हापुरी पद्धतीचे बांधकाम नाल्यावर होत असल्याचे आरोप चापलवाडा व मछली येथील गावकऱ्यांनी केला आहे.

कोल्हापुरी दर्जाचा बांधकाम होत असलेल्या बंधाऱ्यावर प्रत्यक्ष गावकऱ्यांनी जाऊन पाहणी करून बांधकाम व्यवस्थित करण्यासाठी प्रयत्न करावे असे सांगण्यात आले होते. आणि तशी सूचना बांधकाम विभागालाही देण्यात आले असून त्यांनीही या बांधकामाकडे दुर्लक्ष केल्याने सदर कंत्राटदार कुणीच काही करीत नसल्याचे लक्षात येताच राजरोसपणे निकृष्ट बांधकाम सुरूच ठेवले. या बंधाऱ्याच्या बांधकामासाठी वापरात आणलेली रेती बंधाऱ्यासाठी अयोग्य असल्याचे दिसून आले. सदर बांधकामाकरीता रेती ही नाल्यातीलच मातीयुक्त असल्याचे दिसून आले. बंधारा बांधकामापूर्वी खोलीकरण करून बेड काँकेट केल्या जातो. परंतु सदर कंत्राटदाराने बेड काँक्रीट न टाकता सरळ-सरळ खोदकाम करून कामाला सुरुवात केली आहे. पाणी साठवण्यासाठी नाल्याचे खोलीकरण करणे गरजेचे असतांना दुर्लक्ष करीत नाल्याचे करारानुसार खोलीकरण करण्यात आले नसल्याचे प्रत्यक्ष दर्शनी गावकऱ्यांचे आरोप आहे.

चापलवाडा व मछली येथील नाल्यावर कोल्हापुरी पद्धतीचे बांधण्यात येणाऱ्या बंधाऱ्यामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी मुबलक पाण्याचा साठा उपलब्ध होणार असून त्यासोबतच पाण्याची पातळीतही वाढ होणार  आहे. त्यामुळे सदर गावातील नागरिकांनी निकृष्ट दर्जाचे बांधकाम त्वरित बंद करून बंधाऱ्याच्या बांधकामाची चौकशी करण्यात यावी. अशी मागणी गितेश कोहपरे, सुधाकर मेकलवार, प्रभाकर माधवराव, गोपीनाथ बाकवार, संदीप सातपुते, प्रवीण चौधरी,  मिलिंद घोगरे, वामन तणटकवार, दिवाकर भट्टलवार, नामदेव वैरागडे, पुरुषोत्तम गांधरवार, भास्कर तनटकवार, सुधाकर गरतुलवार, नीलकंठ वैरागडे, अक्षय घोगरे, मनोज मंडल, दिनेश किरमे आदी उपस्थित गावकऱ्यांनी मागणी केली आहे.

चापलवाडा मछली येथील कोल्हापुरी बंधाऱ्याचे बांधकाम निकृष्ट होत असल्याने गावकऱ्यांनी तक्रार दिली असून या बांधकामाची सखोल चौकशीसोबतच गावकऱ्यांना विश्वासात घेऊन बांधकाम करावे. यासाठी सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना व चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहे.  

आ. डॉ देवराव होळी

Devrao holi