अहेरी पंचायत समितीत शिवशक राजदंड स्वराज्य गुढीची प.स.सभापती भास्कर तलांडे यांच्या हस्ते उभारणी

शिवराज्याभिषेक दिन अहेरी पंचायत समितीत साजरा.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली : अहेरी पंचायत समितीत शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प. स. सभापती भास्कर तलांडे यांच्या हस्ते शिव राजदंड स्वराज्य गुढीची पूजा अर्चाना करून गुढी उभारण्यात आली.

राज्य सरकारने संपूर्ण महाराष्ट्रात शिव राजदंड स्वराज गुढी उभारण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यामुळे आज जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्राम पंचायत आदि ठिकाणी सदर कार्यक्रम आयोजित करण्यात आले.

यावेळी पंचायत समितीचे विनोद अल्लेवार, कवीश्वर, संजय कोठारी, ऊरेते, वाघाडे, मेश्राम, शेंडे, आशीष कोत्तकोंडावार, आत्राम, चव्हाण आदि उपस्थित होते.

हे देखील वाचा :

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शिवस्वराज्य दिनानिमित्त शिवशक राजदंड स्वराज्यगुढीचे पुजन

गरीब मुलांकरिता अंगणवाडी सुरु करने हा स्त्युत्य सेवा उपक्रम – रामायण खटी

इंधन दरवाढीविरोधात काँग्रेस राज्यात एकाचवेळी १ हजार ठिकाणी करणार आंदोलन