गोंडवाना विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ गडचिरोली येथेच संपन्न होणार: विद्यापीठाने काढली अधिसूचना

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. १९ जानेवारी: गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठाचा आठवा दीक्षांत समारंभ चंद्रपूर येथे आयोजित न करता आता गडचिरोली येथेच हा समारंभ 28 जानेवारीला 11 वाजता संपन्‍न होणार आहे.  हा सोहळा आता आभासी पध्दतीने होणार आहे. अशी माहिती प्रभारी कुलसचिव डॉ. अनिल चिताडे यांनी दिली आहे. याबाबत विद्यापीठाने अधिसूचना काढून माहिती दिली आहे.  

गोंडवाना विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ चंद्रपूर येथे आयोजित करण्‍यात येत असल्‍यामुळे गडचिरोली जिल्‍हयातील नागरिकांच्‍या तिव्र भावना लक्षात घेता हा समारंभ गडचिरोली येथेच विद्यापीठ परिसरात आयोजित करण्‍याची मागणी  जिल्ह्यातील  विविध वर्गाकडून केली जात होती. विविध लोकप्रतिनिधी व राजकीय नेत्यांनी या प्रश्नावर आंदोलनाची भूमिका घेतली होती. त्यामुळे याची दखल घेत आता हा दीक्षांत सोहळा गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथेच आभासी पध्दतीने घेण्यात येणार आहे.

दीक्षांत समारंभाचे अध्यक्ष म्हणून विद्यापीठाचे कुलपती राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, प्रमुख अतिथी म्हणून संचालक नॅक, बंगलोर डॉ. एस. सी. शर्मा तसेच गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. श्रीनिवास वरखेडी, प्र–कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.

Dr. S C SharmaDr. Shriram KawaleGondwana University GadchiroliRajyapal Bhagatsingh KoshyariShriniwas Warkhedi