विनाकारण बाहेर फिरणाऱ्या नागरिकांची पोलीस प्रशासनाकडून होणार कोरोना चाचणी

अकोला शहरात कोरोनाला आळा घालण्यासाठी नाकेबंदी दरम्यान विनाकारण बाहेर फिरणाऱ्या नागरिकांची पोलीस प्रशासनाकडून कोरोना चाचणी करण्यात येत आहे.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

अकोला, दि. ५ मे: अकोल्यात दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. कोरोनाला आळा घालण्यासाठी प्रशासनाकडून नागरिकांना घराच्या बाहेर न पडण्याचं आवाहन करण्यात येत आहे. मात्र, तरी देखील काही नागरिक विनाकारण बाहेर फिरताना दिसून येत आहेत. आता अशा नागरिकांची अकोला पोलीस प्रशासनाकडून कोरोना चाचणी करण्यात येत आहे.

यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कदम, वाहतूक नियंत्रण शाखेचे प्रमुख गजानन शेळके, पोलीस निरीक्षक उत्तम जाधव सह आदीं पोलीस अधिकारी येथे उपस्थित.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता निर्बंध घालण्यात आले आहेत. मात्र, असं असताना काही नागरिक वैद्यकीय कारण सांगून घराबाहेर पडत आहे. त्यामुळे पोलिसांनी आता याविरोधात कडक भूमिका घेतली असून अकोला शहरातील प्रमुख रस्त्यावर नाकेबंदी कऱण्यात आली आहे. या नाकेबंदी दरम्यान, विनाकारण बाहेर फिरणाऱ्या नागरिकांची पोलीस प्रशासनाकडून कोरोना चाचणी करण्यात येत आहे.

हे देखील वाचा :

कोमट पाणी आहे लई बहुगुणी…

राज्यातील सर्व २२ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे राष्ट्रीय सुरक्षा परिषदेमार्फत होणार परीक्षण – वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख

corona testlead story