कोरचीतील विद्यालयात कोरोना चाचणी; ९ विद्यार्थीनी कोरोना बाधित

  • 9 मुलींना आरटीपीसीआर टेस्ट पॉझिटिव आल्याने शिक्षण क्षेत्रात व पालक वर्गात माजली खळबळ
  • कोरचीतील पार्वताबाई विद्यालय ठरले विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी करणारे राज्यातील प्रथम विद्यालय

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

कोरची, दि. ११ जानेवारी:-  वर्ग 9 ते 12 वी शाळा सुरू करण्यासाठी केंद्र सरकारने व राज्य सरकारने पालकांच्या संमती पत्र घेऊन शाळा सुरू करण्याची परवानगी दिली पण कोरोणाचा पादुर्भाव अजूनही कमी झाल्याचे दिसून येत नाही.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोरची तालुक्यातील कोविड केअर सेंटर तर्फे शाळा निर्जंतुकीकरण, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सुद्धा वर्ग 9 वी व 10 वी च्या विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. यामध्ये सर्वप्रथम पारबताबाई विद्यालय बेतकाठी येथे कोरोना चाचणीचा कार्यक्रम घेण्यात आला होता. त्यानंतर धनंजय स्मृती विद्यालय तर कोरची येथील निवासी शासकीय आश्रम शाळेत कोरोना चाचणी करण्यात आली.

यामध्ये पारबताबाई विद्यालय बेतकाठी चे 5 कोरोना बाधित आढळून आले आणि धनंजय स्मृती विद्यालयातील 3 विद्यार्थी कोरोना बाधीत तर निवासी शासकीय आश्रम शाळा कोरची येथील 1 असे एकूण ९ विद्यार्थिनी कोरोना बाधित आढळून आल्याने शिक्षकांमध्ये व पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यानंतर आरटीपीसीआर टेस्ट करण्यासाठी सॅम्पल जिल्हा रुग्णालय गडचिरोली ला पाठविण्यात आले होते.

कोरोणा चाचणीचा अहवाल शाळा प्रशासनास सादर करावयाचा असल्याने विद्यार्थ्याची कोरोणा चाचणी करण्यासाठी शाळेतील मुख्याध्यापकानी यांनी विद्यार्थ्यास मार्गदर्शन करून चाचणी करिता प्रयूक्त केले होते.

Dhananjay Smruit VidyalayParvatabai VidyalayShashkiy Ashram School Korchi