आरोग्यवर्धिनी केंद्र आलापल्ली येथे कोरोना लसीकरणाला सुरुवात

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

आलापल्ली, दि. ८ मार्च: आरोग्यवर्धिनी केंद्र आलापल्ली येथे आजपासून जेष्ठ नागरिकांना  कोरोनावरील लसीकरण सुरू करण्यात आले आहे.  

कोरोनाची दुसरी लाट सुरू असतांना दिवसेंदिवस पुन्हा कोरोनाने रोद्ररूप धारण केलेला आहे. अशावेळी सरकारचे नियोजन ४५ वर्षे वयावरील नागरिकांना कोरोना लस १ मार्च पासून देण्यात येत आहे. तरी जिल्हा पातळीवर तसेच तालुका पातळीवर आणि अनेक ठिकाणी लसीकरणाचे मोहीम राबविण्यास सुरुवात झालेली आहे. आता ज्येष्ठ नागरिकांना मोफत लसीकरणाचा लाभ घेता येईल.

आलापल्ली येथील आरोग्यवर्धिनी केंद्र स्तिथ-मोद्दूमोडगु येथे आज जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. कोरनाची लस घ्यायला जातांना नागरिकांजवळ आधार कार्ड आणि मोबाईल क्रमांक असणे आवश्यक आहे. लसीकरण आठवड्यातून ३ दिवस सोमवार, बुधवार, गुरुवार या दिनी सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत  देण्यात येणार आहे. लसीकरण सदर मोहीम जिल्हा आरोग्य अधिकारी गडचिरोली आणि तालुका आरोग्य अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात येत आहे. या लसीकरणास डॉक्टर आनंद, डॉक्टर विशाल येरावार, वाघमारे, डॉ. अल्का उईके, प्रीती चालुरकर, लता जुमनाके, कोसनवार, कुडमेथे व इतर आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती होते.

corona vaccination