सावळ्या गोंधळामुळे गाजली पालघरची मतमोजणी

उमेदवारांमध्ये प्रचंड संताप, तालुक्यातील 81 ग्रामपंचायत मधील 30 जागांची झाली फेर मतमोजणी, फेरमतमोजणीत काहींना सुखद धक्का तर काहींची झाली निराशा
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

पालघर, 18,ऑक्टोबर :- पालघर येथे झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकीची मतमोजणी अधिकार्यांच्या सावळ्या गोंधळामुळे गाजली आहे. त्यामुळे उमेदवरांमध्ये प्रचंड संताप दिसला आहे. फेरमतमोजणीत काहींना सुखद धक्का तर काहींची निराशा झाली आहे.

पालघर जिल्ह्यातील एकुण 336 ग्रामपंचायतींसाठी रविवार 16 आॅक्टोबर रोजी मतदान झाले आणि सोमवारी 17 आॅक्टोबर रोजी मतमोजणी होती. पालघर मधील इतर 7 तालुक्यात मतमोजणी सुरळीत झाली. मात्र, पालघर तालुक्यातील मतमोजणीच्या वेळी प्रचंड गोंधळ उडून अनागोंदी कारभार पहावयास मिळाला. पालघर तालुक्यातील 81 ग्रामपंचायतीं मधील 30 जागांची फेर मतमोजणी करण्यात आली असता सरपंचा सह सदस्यांच्या निकालात बदल झाला. विशेष म्हणजे आधी विजयी जाहीर केलेले उमेदवार फेरमोजणीत पराभूत झाले तर पराभूत उमेदवार विजयी झाल्याने निवडणूक यंत्रणे विषयी प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.

पालघर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूकीच्या मतमोजणीत गोंधळ निर्माण झाल्याने रात्री दहा वाजेपर्यंत फेरमोजणी शुरू होती. यावेळी काही पराभुत उमेदवारांना सुखद धक्का बसला तर काही विजेत्या उमेदवारांनी विजयाचा जल्लोष साजरा करून देखील त्यांच्या पदरी निराशा पडली. पालघर तालुक्यातील मनोर, टेन, दहिसर, बर्हाणपूर, पंचाळी, बेटेगाव, नवघर घाटीम, भादवे आदिंसह अनेक ग्रामपंचायमध्ये फेर मतमोजणीत धक्कादायक बदल झाले आहेत. हे अनपेक्षित बदल झाल्याने अनेक उमेदवारांनी तहसीलदार सुनित शिंदे यांच्याकडे फेर मतमोजणीसाठी अर्ज दाखल केले आहेत. ही मतमोजणी रात्री दहा नंतर देखील सुरू होती. तर काही उमेदवार मतमोजणीच्या भोंगळ कारभाराविरोधात कोर्टात न्याय मागणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे पालघर तहसील कार्यालयात मतमोजणी मध्ये झालेला हा सावळा गोंधळ नेमका कशामुळे निर्माण झाला याबाबत अनेक शंका कुशंका व्यक्त केल्या जात आहे. तसेच सरकार ने याबाबत गंभीर दखल घेउन मतमोजणीची संपूर्ण जबाबदारी असलेल्या तहसीलदार यांच्यासह सर्व संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

हे देखील वाचा :-

राॅजर बिन्नी भारतीय क्रिकेट मंडळाचे नवे अध्यक्ष

countinggrampanchayatpa;gharvote