लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
गडचिरोली, 26 ऑगस्ट : देसाईगंज तालुक्यातील डोंगरगाव येथील तीन दारू विक्रेत्यांपैकी एका विक्रेत्याकडे मिळून आलेली एक पेटी देशी दारू जप्त करून पुढील बैठकीत निर्णयाप्रमाणे दंड वसूल करण्याचा निर्णय घेतला आहे. ही कृती गाव संघटना व मुक्तिपथ तालुका चमूने संयुक्तरित्या केली.
डोंगरगाव हे पेसा गाव असून मादक द्रव्य समिती कार्यरत आहे. तरीसुद्धा गावात अवैध दारूविक्री केली जाते. संबंधित विक्रेत्यांना नोटीस बजावूनही त्यांनी आपला अवैध व्यवसाय सुरूच ठेवला आहे. अशातच डोंगरगाव येथील काही विक्रेते अवैध दारूविक्री करीत असल्याची गुप्त माहिती मिळाली. माहितीच्या आधारे गाव संघटना व मुक्तिपथ तालुका चमूने शोधमोहीम राबवून तीन दारूविक्रेत्यांना नोटीस बजावण्यात आले. सोबतच एका विक्रेत्याकडे मिळून आलेली एक पेटी देशी दारू जप्त करून ग्रामपंचायत प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आली.
संबंधित विक्रेत्यावर निर्णयाप्रमाणे कारवाई करण्याचा ठरविण्यात आले आहे. पुढील सभेत शासकीय दाखले योजना रद्द करून दंडात्मक रक्कम आकारणे आणि ती रक्कम न भरल्यास तेवढ्या रकमेची वस्तू जप्ती पंचनामा करून घेण्यात येणार आहे. डोंगरगाव गट ग्रामपंचायत मध्ये समाविष्ट अरततोंडी नवी आणि जुनी या दोन्ही गावात गावसभा घेऊन अवैध दारूविक्री बंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच चिखली रीठ हे विक्री बंद गाव असून चिखली तुकुम येथे दोन दारू विक्रेते चोरट्या मार्गाने विक्री करतात. या गावातील दारू बंद करण्यासाठी गावसभा घेऊन निर्णय घेणे गरजेचे आहे, असे मत ग्रामस्थांतून व्यक्त केले जात आहे. तसेच डोंगरगाव येथील अवैध दारूविक्री तत्काळ बंद करण्याची मागणी होत आहे.
हे पण वाचा :-
https://youtu.be/xN8-CONcG2c
https://youtu.be/V_WLWQtGeKU