कोरोना लसीला अधिकृत परवानगी मिळण्यासाठी सिरम कंपनीने केंद्राकडे परवानगी मागितली,या परवानगीकडे डोळे लागले:राजेश टोपे.

विजय साळी (जालना), लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

जालना, दि. ९ डिसेंबर: कोरोना लसी संदर्भात 5 महत्वाच्या कंपन्या काम करत असून यापैकी 2 शासकीय असून 3 खाजगी आहेत.पुण्यातील सिरम इस्टिट्यूटचे संचालक ऑदर पुनावाला यांनी ट्विट करून केंद्र सरकारकडे लसीला अधिकृत करण्यासाठी परवानगी मागितलेली आहे. सिरमच्या कोरोना लसी संदर्भातील वैद्यकीय चाचण्या संपल्या असून या लसीला आता परवानगी द्या,अशी मागणी त्यांनी केंद्राकडे केली आहे.

ऑक्सफर्ड विद्यापीठाने देखील सिरमच्या 30 ते 35 हजार लोकांवर चाचण्या घेतल्या असून पुण्यातील सिरमने देखील १ हजार पेक्षा जास्त लोकांवर चाचण्या घेतल्या आहे. त्यामुळे सिरमने लसीला परवानगी मिळण्यासाठी ड्रग अँथॉरिटी ऑफ इंडियाकडे दाद मागितली आहे. मात्र ड्रग अँथॉरिटी ऑफ इंडिया प्रोटोकॉलनुसार या मागणीवर कारवाई करेल असा विश्वास टोपे यांनी व्यक्त केला. सिरम कंपनीचे कोरोना लसीसंदर्भातील काम बऱ्यापैकी संपलेले असून ड्रग अँथॉरिटी कडून या लसीला परवानगी मिळणे आवश्यक असल्याचं टोपे म्हणाले.
आता प्रत्येक राज्य आणि केंद्र सरकारने ट्रान्सपोर्ट आणि कोल्डचेनची व्यवस्था करणे गरजेचं असल्याचं देखील टोपे म्हणाले हे काम महाराष्ट्रात अत्यंत वेगाने सुरु असल्याचं देखील त्यांनी सांगितलं. सिरम कंपनीला महाराष्ट्रातील कोल्डचेन, लॉजिस्टिक्स, ट्रेंनिग याबाबत टार्गेट दिले होते ते पूर्ण केले आहे त्यामुळे मला असे वाटते की,केंद्रशासनाकडे आता या सगळ्या बाबतीत डोळे लागले आहेत जर त्यांनी परवानगी दिली तर पुढील काम आपल्याला करता येऊ शकेल असेही ते म्हणाले.