विरोधकांचे काम टिका करण्याचे; आमचा एजेंडा विकासाचा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

पैठण/ औरंगाबाद 13 सप्टेंबर :-  दाऊद-मेमनचे हस्तक होण्यापेक्षा पंतप्रधान मोदी व अमित शाह यांचा सहकारी होण्यात अभिमान आहे आम्हाला साबणाचे बुडबुडे म्हणणाऱ्यांची आम्ही त्याच साबनाने धुलाई केली, अशी टीका सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. मुख्यमंत्री शिंदे यांची पैठणमध्ये सभा झाली. यावेळी त्यांनी अजित पवारांच्या नाराजी नाट्यावर भाष्य केले.

शिवाय सुप्रिया सुळे यांच्यावरही टीका केली. मुख्यमंत्री म्हणाले, टीका करणे विरोधकांचा धंदा आहे, त्यांना टीका करू द्या. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, अजित पवार पहाटे सहापासून कामाला लागतात. मी त्यांना सांगतो की, मी सकाळी सहा वाजेपर्यंत लोकांचे काम करतो. मला कंत्राटी मुख्यमंत्री म्हणतात; होय मी कंत्राटी मुख्यमंत्री ज्याने महाराष्ट्रातील गोरगरीब, शेतकरी व माता भगिनी व सर्वसामान्य लोकांच्या विकासाचे कंत्राट घेतले आहे. मुख्यमंत्री म्हणाले, पाणीपुरवठ्याला निधी कमी पडू देणार नाही. या भागाला न्याय देण्यासाठी मी प्रयत्नशिल आहे.

वैजापूर-गंगापूर मतदारसंघात मराठवाडा वॉटरग्रीडसाठा मंजूर झाले आहेत. हे सरकार काम करणारे सरकार आहे. दोन महिन्यात ऐतिहासिक आणि क्रांतिकारी निर्णय घेतले. त्यांच्या पायाखालची वाळू सरकली. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री जनतेत फिरत असल्याची भिती त्यांच्या मनात आहे, म्हणूनच ते आरोप, टीका करीत आहेत.

हे देखील वाचा :-

 

CM eknath shindepaithan sabhashiv shenaUddhav Thackarey