आषाढीवारीच्या अनुषंगाने पंढरपूरसह ९ गावात संचारबंदी; महापूजेसाठी मुख्यमंत्री येणार पंढरपूरला

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

सोलापूर : आषाढीवारीच्या अनुषंगाने १७ ते २५ जुलै दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी संचारबंदी चे आदेश काढले असून या १९ ते २५ जुलै दरम्यान कुणालाही दर्शन घेता येणार नाही. तसेच आषाढी वारीच्या महापूजेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उपस्थित राहणार असल्याचे माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली आहे.

१९ ते २५ जुलै दरम्यान कुणालाही दर्शन नाही. या दरम्यान मानाच्या १० पालख्यांना मान्यता देण्यात आलाय आहे मात्र वाखरी ते इसबावी दरम्यान प्रत्येक पालखी सोबत ४० वारकऱ्यांना मान्यता देण्यात आली आहे. १९ तारखेला वाखारील वारकरी पोहचतील. वारकऱ्यांचे RTPCR करण्यात येणार आहेत. अशी माहिती जिल्हाधिकारीं मिलिंद शंभरकर यांनी दिली आहे.

हे देखील वाचा  :

पोलिस हवालदाराची (वाहनचालकाची) धारदार चाकूने गळा कापून हत्या!

तब्बल ३५ लांखांचा गुटखा जप्त करण्यात पोलिसांनी मिळाले यश

पोलिस कॉन्स्टेबलची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या!

 

 

CM Uddhav Thackareylead storyPandharpur Vitthal