वर्ध्यात आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत सायकल यात्रा

राष्ट्रपित्याला केले अभिवादन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

वर्धा, दि. १२ मार्च: आझादी का अमृत महोत्सवानिमित्त वर्धेतील महात्मा गांधीजींच्या पुतळ्या पासून राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्र सेनाच्या विद्यार्थ्यांचा सहभाग असलेली सायकल यात्रा महात्मा गांधीजींच्या सेवाग्राम येथील बापुकुटी आश्रम पर्यंत काढून राष्ट्रपित्याला अभिवादन करण्यात आले.

सेवाग्राम आश्रम येथील बापु कुटीत वर्ध्याचे पालकमंत्री आणि राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनिल केदार, वर्ध्याचे खा. रामदास तडस, जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी बापूंच्या स्मृतींना अभिवादन केले. वर्धेत बापू़जींच्या पुतळ्याला सूतमाळ अर्पण केल्यानंतर जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी सायकल यात्रेला हिरवी झंडी दाखवून यात्रेला प्रारंभ केला. यात्रेचा समारोप आश्रमात झाल्यानंतर सर्व अधिकारी आणि विद्यार्थ्यांनी बापू कुटीत सूतमाळ अर्पण करून गांधीजीना भावपूर्ण अभिवादन केले. यात्रेत २५ मुली व मुलं सहभागी झाली होती. याप्रसंगी सामुदायिक प्रार्थना सुद्‌धा घेण्यात आली.