डी.एल.एड. प्रवेशाला 5 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

गडचिरोली, 29 जुले – राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांचे मार्फत शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी डी.एल.एड. प्रथम वर्ष ऑनलाईन प्रवेशअर्ज भरण्यासाठी 5 ऑगस्ट 2024 पर्यत मुदतवाढ देण्यात आली आहे. या कालावधीत www.maa.ac.in या संकेतस्थळावर अर्ज भरावे, असे प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्ष्ण संस्था, गडचिरोली यांनी कळविले आहे.