डहाणू – तलासरी भूकंपाने पुन्हा हादरलं..

नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण..

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, 

मनोज सातवी / पालघर 

पालघर मधील डहाणू तालुका पुन्हा एकदा भूकंपाने हादरला आहे. आज शुक्रवारी रात्री ९ वाजून ५३ मिनिटांनी हा भूकंपाचा जोरदार धक्का बसला. या नवीन वर्षातील हा भूकंपाचा तिसरा धक्का आहे. भूकंपामुळे नागरिकांमध्ये पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भूकंपाचा धक्का बसल्याने नागरिकांनी घराबाहेर पळाले आणि सुरक्षित स्थळी थांबल्यानंतर पुन्हा घरात गेले. यात अद्याप कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

भूकंपाची शृंखला पुन्हा सुरू..?

पालघर मधील डहाणू आणि तलासरी तालुक्यात २०१८ साला पासून भूकंपाचे धक्के बसण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. डहाणू आणि तलासरी परिसरातील गावांना सतत भूकंपाचे सौम्य आणि मध्यम स्वरूपाचे धक्के बसत असल्याने सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थी, शिक्षक यांच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. धुंदलवाडी, तलासरी, घोलवड, बोर्डी आणि इतर गावं भूकंपाच्या धक्क्याने हादरली आहेत.