अवकाळी पावसाने गव्हाचे नुकसान

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

लातूर, दि. 19 फेब्रुवारी: लातूर जिल्ह्यात गेली दोन दिवस हलक्या स्वरुपाचा पाउस सुुरु आहे. शुक्रवारी पहाटे तिन ते सकाळी सात वाजे पर्यंत मात्र जिल्ह्यातील कांही भागात मध्यम स्वरुपाचा पाउस झाला. सर्वाधिक पाउस लातूर तालुक्यात झाल्याची नोंद जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे झाली आहे. इतर तालुक्यात हालका पाउस झाला. शुक्रवारी दिवसभर हवेत चांगलाच गारठा होता. अनेकांनी पुन्हा स्वेटर बाहेर काढल्याचे दिसुन येत होते.

दोन दिवस झालेल्या या पावसाचा मोठा फटका हा लातूर तालुक्यातील मुरुड, भिसे वाघोली परिसराला बसला आहे. इतर ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे काढणीला आलेल पिक आडव झाल आहे. शिरुर अनंतपाळ तालुक्यातील येरोळ परिसरात वाऱ्यामुळे गव्हु अडावा झाल्याचे चित्र दिसत आहे.
मुरुड परिसरात पहाटे चांगला पाउस झाल्याचे सांगुन सत्तार पटेल म्हणाले की, या अवकाळी मुळे हरभऱ्याचे घाटे गळुन पडले आहेत, ज्वारी आणि गव्हु आडवा झाला आहे. पावसामुळे या दोन्ही पिकाच्या उत्पादनावर फरक पडतो तो म्हणजे ज्वारी काळी पडते, गव्हाचा ही रंग बदलतो त्यामुळे भाव मिळण्यास अडचणी निर्माण होतात व शेतकऱ्यांचे नुकसान होते.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार पाउस पडला असला तरी निसर्गाने इतर विभागाच्या तुलनेत लातूर जिल्ह्यावर कृपाच केली असल्याची प्रतिक्रिया अनिल दुडीले यांनी व्यक्त केली. ज्या शेेतकऱ्यांचे पिके काढणीला आले आहेत त्यांच नुकसान होणार आहे परंतु इतर ठिकाणी जशी गारपिट झाली त्यामुळे जे नुकसान झाल तस लातूर जिल्ह्यात झाल नाही ही कृपाच मानावी लागेल. दिवसभर हवेतील गारठा हा रोगराईला पुन्हा कारणीभुत ठरु शकतो असे ही सांगितले जात आहे.