दहावी आणि बारावी परीक्षेच्या तारखा जाहीर – शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क, दि. २१ जानेवारी: कोरोना व्हायरसने संपूर्ण जगात  थैमान घातलं आहे. गेल्या वर्षी भारतात दाखल झालेल्या या विषाणूमुळे सर्वच क्षेत्रांना मोठा फटका बसला. त्याचप्रमाणे विद्यार्थांचे देखील मोठे नुकसान झाले आहे. सध्या काही राज्यात कोरोना नियमांचे पालन करून शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. पण मुंबईत अदयाप शाळा सुरू झालेल्या नाहीत. गेल्या काही दिवसांपासून 10वी आणि 12वीच्या परीक्षा कधी होणार, परीक्षा कशी होणार असा प्रश्न विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना देखील पडला होता. मात्र आता 10वी आणि 12 वीच्या परीक्षांची वेळ निश्चित करण्यात आली आहे. यंदाच्या वर्षी 12 वी ची परीक्षा 23 एप्रिल ते 29 मे  2021 दरम्यान सुरु होईल.

बारावीची प्रॅक्टिकल परीक्षा 1 एप्रिल ते 22 एप्रिल दरम्यान घेतली जाणार आहे. तर दहावीची प्रॅक्टिकल परीक्षा 9 एप्रिल ते 28 एप्रिल दरम्यान पार पडणार आहे. कोरोनामुळे दहावी-बारावी परीक्षेचं वेळापत्रक कोलमडलं आहे. दरवर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये सुरु होणाऱ्या परीक्षा उशीराने होत आहे. सध्या मुंबई, ठाणे वगळून राज्यातील बहुतेक ठिकाणी नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाले आहेत. शिवाय लॉकडाऊन काळातही ऑनलईन वर्ग सुरु होते.

10 वी इयत्तेच्या परीक्षा 29 एप्रिल ते 31 मे 2021 च्या दरम्यान होणार असून निकाल ऑगस्ट अखेरीस जाहीर होणार आहे तर 12 वीचा निकाल जुलै अखेर जाहीर करण्यात येण्याची माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. 

HSC and SSC exam date