लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
मुंबई, 13, सप्टेंबर :- कुविख्यात गुंड दाऊद इब्राहिमने २० वर्षांनंतर पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. त्याची गँग पुन्हा एकदा गुन्हेगारी विश्वात सक्रिय झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे मुंबईत पुन्हा गँगवार भडकू नये म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.
दोन तीन महिन्यांपूर्वी एनआयए ने डॉन दाऊदशी संबंधित २९ ठिकाणी छापेमारी केली होती. मुंबईतल्या बोरिवली, सांताक्रूझ, भेंडी बाजार, नागपाडा, मुंब्रा या भागात हे छापे टाकण्यात आले होते. सध्या मुंबईत दाऊद टोळी कडून ड्रग्ज आणि टेरर फंडिंगसाठी प्रयत्न केले जात आहेत.रिअल इस्टेट आणि मनी लॉंनडरिंग माध्यमाद्वारे दाऊद गॅंगला फ़ंडीग होत असल्याचेही आरोप होत आहेत. ही सर्व परिस्थिती पाहता देवेंद्र फडणवीस यांनी ही बाब गंभीरपणे घेतली असून दाऊद इब्राहिमला डेचून काढून त्याचा व त्याच्या गँगचा बंदोबस्त करण्याचे आदेश पोलीस दलाला दिले आहेत.
हे देखील वाचा :-
लम्पी आजाराबाबत संबधितांनी सतर्कता बाळगून नियमांचे पालन करावे – जिल्हाधिकारी गडचिरोली