गोविंदाच्या जीवघेण्या खेळात गोविंदाचा मृत्यू !

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई, २४, ऑगस्ट :- दहीहंडीला खेळाचा दर्जा आणि गोविंदाना सरकारच्या ५ टक्के कोट्यातून सरकारी नोकरी ही मुख्यमंत्र्यांनी केलेली घोषणा हवेत विरते न विरते तोवरच संदेश दळवी नावाच्या गोविंदाचा ६व्या थरावरून पडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. याप्रकरणी आयोजक रियाज शेख याच्या विरोधात विलेपार्ले पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
संदेश दळवी याच्या मृत्यूचा विषय विधानसभेत शिवसेनेचे आमदार अजय चौधरी यांनी उपस्थित केला होता. मात्र मृत्यू पावलेल्या गोविंदाला १० लाख रुपये देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती, मात्र ती मदत कोणत्या खात्यामार्फत दिली जाणार हे स्पष्ट केले नव्हते. अखेर ही मदत मुख्यमंत्री सहायता निधीतून वर्ग करण्यात आली.
याबाबत मृतांच्या नातेवाईकांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता, ते प्रतिक्रिया देण्याच्या मनस्थितीत नव्हते. यामुळे एक प्रश्न ऐरणीवर आला असून राज्यकर्त्यांनी सवंग लोकप्रियतेसाठी घोषणा करताना त्याचा समाजजीवनावर काय परिणाम होईल, याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.

हे देखील वाचा :-

बरडकिन्ही गावाबाहेरुन आवळगांव जाणा-या मुख्य रस्त्याला मोठं मोठे खड्डे..

dahi handidahi handi Accidentmumbai