लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली : खेरवाडी सोशल वेल्फेअर मुंबई आणि मुकुंद माधव फाउंडेशन द्वारा नवेली प्रोजेक्ट अंतर्गत आदिवासी महिलांसाठी टाकाऊ बॉटल पासून सुरक्षित कुरमा घर बांधण्यात आले.
कनाल्हटोला, एरंडी, पवनी टोला आणि वाघ भूमी या ठिकाणचे विश्रांती गृहाचा आज उद्घाटन तथा लोकार्पण सोहळा संपन्न करण्यात आला व कुरमा घर हा आदिवासी महिलांना सुपूर्त करण्यात आला. या घराचे वैशिष्ट्य म्हणजे या घरात विटाच्या जागी प्लास्टिक बॉटल चा उपयोग करून हे घर बांधण्यात आले आहे.
या आधी धानोरा तालुक्यातील चार गावांमध्ये कुरमा घर एनजीओ द्वारे बांधण्यात आले होते. महिलांमध्ये कुरमा घर ही प्रथा पारंपारिकरित्या चालत आहे. या प्रथामध्ये आदिवासी महिला मासिक पाळी दरम्यान एखाद्या छोट्याशा झोपडीत राहतात. त्यात त्यांना कुठल्याही प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध नव्हत्या. खाली झोपायचे त्या दरम्यान त्यांना खूप त्रास व्हायचं.
त्यांच्या भावना लक्षात घेता त्या महिलांसाठी एक विश्रांतीगृह बांधण्याचा संकल्पनेतून हा बॉटल हाऊस तयार करण्यात आला आहे. या विश्रांतीघृहात बेड्स, सोलर लाइट्स फॅन, सिलाई मशीन, वॉटर फिल्टर, संडास, बाथरुम सारखे अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यात आले आहे.
या कार्यक्रमाला डॉक्टर आनंद बंग, धानोरा तहसील कार्यालयाचे तहसीलदार पितुलवार साहेब, आणि नायब तहसीलदार भगत साहेब, मुकुंद माधव फाउंडेशन च्या वतीने फिनोलेक्स अधिकारी निखिल राऊत व त्यांच्या टीम यांच्या उपस्थितीत तसेच धानोरा स्टेट व्यवस्थापक विशाल हरडे, संस्थेचे ऑपरेशनल मॅनेजर विलास कांबळे, प्रोजेक्ट इंजिनियर प्रशांत मंडावार, तालुका समन्वक अमोल ठवरे, हरिदास कांबळे, गणेश गुढी, प्रवीण रामटेके, जयकुमार भैसारे, आशिष मशाकेत्री आदी उपस्थित होते.
हे देखील वाचा :
जेष्ट समाजसेवक अण्णा हजारे यांच्या वाढदिवसानिमीत्य पोलीस चौकी आलापल्ली येथे वृक्षारोपण
शेतकऱ्यांच्या बोनससाठी खा. अशोक नेते यांची राज्यपालांशी चर्चा