मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण (RFO) यांनी DFO विनोद शिवकुमार यांच्या जाचाला कंटाळून केली आत्महत्या

DFO विनोद शिवकुमार याला केली अटक

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

अमरावती, दि. २६ मार्च: मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील गुगामल वन्यजीव परिसरातील हरिसाल रेंज च्या  RFO दिपाली चव्हाण यांनी त्यांच्या शासकीय निवासस्थानी स्वतःवर गोळी झाडून काल सायंकाळी आत्महत्या केली,या आत्महत्येने  मेळघाट व्याघ्र प्रकल्पात चांगलीच खळबळ उडाली आहे.

दिपाली चव्हाण यांनी आत्महत्येपूर्वी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे अपर मुख्य प्रधान सरक्षक रेड्डी यांच्या नावाने ४ पाणाची सुसाईड नोट लिहिली यात त्यांचे वरिष्ठ अधिकारी उप वनसंरक्षक विनोद शिवकुमार हे आपल्याला गावकरी व कर्मचाऱ्या समोर अश्लील शिवीगाळ करतात, मानसिक त्रास देतात, रात्री बेरात्री भेटायला बोलावतात त्यांची मनाप्रमाणे न वागल्याने ते वारंवार सस्पेंड करण्याची धमकी देत असल्याचे नमूद केले आहे. यापूर्वी विनोद शिवकुमार यांची रेड्डी यांच्या कडे तक्रार केली होती. मात्र त्यांनी कुठलीच कारवाई केली नसल्याचं उल्लेख या सुसाईड नोट मध्ये आहे.

दिपाली चव्हाण यांना शिवकुमार यांनी ट्रेक ला बोलावले आपण प्रेग्नंट असल्याने ट्रेक करू शकली तरी मुद्दामुन ३ दिवस मालुर च्या कच्या रस्त्याने फिरविले यामुळे आपला गर्भपात झाल्याचा गंभीर आरोप देखील या नोट मध्ये करण्यात आला. काम केल्या नंतरही अनेक बिल काढली नसल्याचा देखील उल्लेख त्यांनी केला.या आत्महत्ये मुळे वन विभागात चांगलीच खळबळ उडाली आहे.

दीपाली चव्हाण प्रकरणात दोषी असलेले उप वनसंरक्षक विनोद शिवकुमार याला अटक करण्यात यावी तिला न्याय मिळाला पाहिजे म्हणून भारतीय जनता पक्ष व विविध सामाजिक संघटनाच्या वतीने आज आंदोलन करण्यात आले.

दीपाली चव्हाण ला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणारे डीएफओ विनोद शिवकुमार यांना नागपुर येथून आज सकाळी अटक करण्यात आली असल्याचे अमरावती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ हरी बालाजी एन यांनी माहिती दिली आहे.

दिपाली चव्हाण यांच्या आत्महत्येची सखोल चौकशी करण्यात येणार असल्याचेही पोलीस अधीक्षक यांनी सांगितले.

RFO Dipali Chavhan Sucide Case