न्यायालयाने दिली २ दिवसाची पोलीस कोठडी.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
अमरावती, दि. २९ एप्रिल: मेळघाटातील बहुचर्चित हरिसाल वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून २५ मार्च रोजी स्वतः वर गोळी झाळून आत्महत्या केली होती.. आत्महत्यापूर्वी त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे चिठ्ठीत नमूद केले होते..त्याचप्रमाणे उप वनसंरक्षक शिवकुमार बाला यांच्या नावाचा उल्लेख देखील चिठ्ठीत करण्यात आला होता. या संदर्भात पोलिसांनी तपास करून शिवकुमार बाला यांंना मुख्य आरोपी म्हणून अटक केली. त्यानंतर बाला यांंना न्यायालयीन कोठडी सूनविण्यात आली आहे.
शिवकुमार सह श्रीनिवास रेड्डी यांंना सुद्धा अटकेची मागणी होऊ लागली त्यामुळे या प्रकरणाचा तपास एकसदस्य समिती कडे देण्यात आला. आयपीएस प्रज्ञा सरवदे यांनी संपूर्ण तपास करीत अखेर सह आरोपी म्हणून मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी यांच्यावर धारणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. आज दुपारी त्यांना दिवाणी व फोजदारी न्यायालय धारणी येथे हजार करण्यात आले. प्रथम न्यायाधीशांनी त्यांना १ मे पर्यंत म्हणजेच दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.