राज्यात डेल्टा प्लस रुग्णांच्या संख्येत वाढ

रत्नागिरी, जळगाव, मुंबई, औरंगाबाद, बीडमध्ये आढळले रूग्ण

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  

मुंबई 09-Aug-2021:- राज्यात डेल्टा प्लस रुग्णांच्या संख्येत वाढ झालेली आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. २१ वरून ही संख्या ४५ वर गेलेली आहे. यात पुरुष २७, स्त्रिया १८ असा समावेश आहे. रत्नागिरी, जळगाव, मुंबई इथे हे रुग्ण आहेत, तर औरंगाबाद, बीडमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आहेत. त्यामुळे आता नागरिकांनी अधिक काळजी घ्यावी.

प्रत्येक जिल्ह्यातील १०० नसुन घेतले जातात आणि त्यात बदल झाले आहेत का त्याची तपासणी केली जात असल्याची माहिती आरोग् मंत्र्यांनी दिली आहे.  यात ४५ डेल्टाचे डेल्टा प्लस रुग्ण आढळले आहेत. मात्र घाबरण्याचे कारण नसल्याचे राजेश टोपेंनी सांगितले आहे.  कारण डेल्टा आणि डेल्टा प्लसमध्ये फार काही फरक नसतो.

या रुग्णांची आपण विशेष काळजी घेत आहोत.  त्यांच्या संपर्कात कोण कोण आलंय त्याची बारकाईने माहिती घेत आहोत, अशी माहिती देखील यावेळी आरोग्य मंत्री राजेश टोपेंनी दिली आहे. कोविडची स्थिती मागील महिन्यांपासून सारखीच आहे.  रुग्णसंख्या कमीही होत नाही आणि वाढतही नाही ती ६ ते ७ हजारच्या घरातच आहे.

covid 19delth virousmaharashtranew casesRajesh Tope