लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली, 22, सप्टेंबर :- सिरोंच्या तालुक्यात मागील जुलै ,ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टी याशिवाय मेडिकट्टा धरणामुळे मोठ्या प्रमाणात फटका बसला . याशिवाय तीनही नद्या महापुराने फुगल्याने तीनही नद्यांना महापूर आल्याने तब्बल 21 गावातील शेतकऱ्यांना तसेच स्थानिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला होता .शासना मार्फत घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पंचनामा करून नुकसानग्रस्त शेतकरी तसेच अतिवृष्टीत सापडलेल्यां नागरिकांना तात्काळ आर्थिक मदत देण्याचे आश्वासनही राज्य सरकारने दिले होते. मात्र आजतागायत कुठलीच प्रशासनाकडून मदत मिळाली नसल्याने आजही स्थानिक नागरिकांना मोठ्या समस्येचा सामना करावा लागत आहे.. त्यामुळे सिरोंचातील पूरग्रस्त तसेच मेडिकट्टा प्रकल्पग्रस्त यांना तात्काळ मदत मिळण्यासाठी आदिवासी विद्यार्थी संघाचे नेते तथा माजी आमदार दीपक दादा आत्राम यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंत्रालयात भेट घेऊन आर्थिक मदत तात्काळ देण्यासाठी विनंती व निवेदन दिले आहे.
माजी आमदार दिपक दादा आत्राम यांनी मुख्यमंत्र्यांना प्रत्यक्ष भेटून चर्चेअंती त्यांना दिलेल्या निवेदनात, सिरोंचा तालुक्यातील 21 गावातील शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांची अतिवृष्टी, पूर व प्रकल्पाचे बॅक वाटरमुळे घरे,शेती,गुरे ढोरे व शेळ्यांचे नुकसान झाले असून प्रशासनाने पूर व प्रकल्पाबाधितांना 2 ते 3 आठवडे सुरक्षित स्थळी हलविले असून पुराचे भीतीने आज ही काही गावातील नागरिक राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला तात्पुरत्या स्वरूपाचे झोपड्या बांधून वास्तव्याने राहत आहे. जिल्हा प्रशासनाने बाधित गावांची पंचनामे करून शासन स्तरावर कळविले आहे. संबंधित समस्याला आपण गांभीर्याने घेऊन अतिवृष्टीग्रस्त,पूरग्रस्त व मेडिगड्डा कालेश्वर सिंचन प्रकल्पबाधितांना नुकसानीचे आर्थिक मदत अतिशीग्र मिळवून देण्याची मागणी केली आहे.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी आमदार दिपक आत्राम यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे माहिती असून मुख्यमंत्र्यांसोबत भेटीदरम्यान माजी आमदार दिपक आत्राम यांनी अहेरी विधानसभा क्षेत्रातील पाचही तालुक्यातील ज्वलंत समस्या मुख्यमंत्र्याच्या निदर्शनास आणल्याची विश्वसनीय माहिती आहे.
हे देखील वाचा :-
महात्मा गांधीजींची कर्मभूमी असलेला वर्धा, गडचिरोली जिल्हा मद्यव्यसनात आघाडीवर.
धारावीच्या पुनर्विकासाचा १८ वर्षे रखडलेला प्रकल्प अखेर मार्गी लागणार !