देसाईगंज हादरलं – व्यापाऱ्यासह दोघांवर बलात्काराचा गुन्हा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली : जिल्ह्यातील देसाईगंज शहरात हायप्रोफाईल व्यापाऱ्यासह त्याच्या साथीदारावर बलात्काराचा गंभीर गुन्हा दाखल झाल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. देसाईगंज येथील सुवर्ण व्यावसायिक सुनील बोके आणि त्याचा मित्र अक्षय कुंदनवार यांच्यावर स्थानिक तरुणीने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून लग्नाचे आमिष दाखवून वारंवार शारीरिक संबंधांचा दबाव टाकल्याचे तसेच अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी दिल्याचे धक्कादायक तपशील तक्रारीत नमूद करण्यात आले आहेत पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार दोन्ही आरोपींनी अत्यंत नियोजनपूर्वक तरुणीचा विश्वास संपादन करून तिला लग्नाचे आश्वासन दिले मात्र प्रत्यक्षात ते केवळ शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी दबाव टाकत राहिले इतकेच नव्हे तर अश्लील फोटो काढून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन तरुणीला मानसिकदृष्ट्या छळले अखेर असह्य परिस्थितीत तरुणीने थेट पोलिसांकडे धाव घेत आपल्यावर झालेल्या अत्याचाराची माहिती दिली.

या गंभीर प्रकरणाची दखल घेत देसाईगंज पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपींवर नवीन भारतीय दंड संहितेनुसार बलात्कारासह संबंधित गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे कारवाईनंतर आरोपी सुनील बोके व अक्षय कुंदनवार यांना अटक करण्यात आली असून न्यायालयासमोर हजर केल्यावर त्यांना १९ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे पोलिसांच्या या तातडीच्या कारवाईमुळे शहरात मोठी चर्चा रंगली असून व्यापारी वर्गातही भीतीचे आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे

या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप आगरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून घटनेमुळे देसाईगंज परिसरात संतापाची लाट पसरली आहे पीडितेला न्याय मिळावा अशी मागणी समाजातील विविध स्तरांतून होत आहे तर आरोपींच्या अटकेनंतर या गुन्ह्याचा धागा किती खोलवर जातो हे पुढील तपासातून स्पष्ट होणार आहे.