विधान परिषद निवडणुकीच्या मतदानासाठी सूक्ष्म नियोजन करावे – विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

नाशिक 16 जानेवारी :-  महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी 30 जानेवारी, 2023 रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 5 या कालावधीत जळगाव जिल्ह्यातील 40 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या निवडणुकीचे सूक्ष्म नियोजन करावे. या कालावधीत आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे, असे निर्देश नाशिक विभागाचे विभागीय महसुल आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिले.
महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त श्री. गमे हे आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूकीशी संबंधित नोडल अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस जिल्हाधिकारी अमन मित्तल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज आशिया, पोलीस अधीक्षक एम. राजकुमार आदि उपस्थित होते.

विभागीय आयुक्त श्री. गमे म्हणाले, या निवडणुकीच्या कालावधीत आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन होईल, अशी दक्षता घ्यावी. मतदान केंद्रांवर मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात. मतदान केंद्रावर पोलिस बंदोबस्त तैनात करावा. त्यासाठी कृती आराखडा तयार करावा. मतदान केंद्रांवरील दळण- वळण सुविधांचा आढावा घ्यावा. मतदान झाल्यानंतर मतमोजणीची प्रक्रिया समजून घ्यावी. त्यासाठी नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांचा प्रशिक्षण वर्ग आयोजित करावा. मतदान व मतमोजणीसाठी सूक्ष्म निरीक्षक नियुक्त करावेत. त्यांचेही प्रशिक्षण घ्यावे. मतपेटया तपासून घ्याव्यात. मतदान साहित्य ताब्यात देतना आवश्यक ती काळजी घ्यावी. सर्व नोडल अधिकारी यांनी त्यांचेवर सोपविलेली जबाबदारीचे तंतोतंत पालन करावे, कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रांवर आवश्यक ती दक्षता घ्येण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी दिल्यात.

हे पण वाचा :-