गडचिरोली जिल्यातील तिन्ही विधानसभा जिंकण्याचा निर्धार- अशोकजी नेते

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

गडचिरोली, 05 ऑगस्ट- भारतीय जनता पार्टी जिल्हा गडचिरोली च्या वतीने जिल्हा विस्तारित कार्यकारिणी बैठक आज दिनांक ५ ऑगस्ट २०२४ रोजी सोमवारी सेलिब्रेशन फंशन हाँल चामोर्शी रोड, गडचिरोली येथे आयोजित करण्यात आली होती.

जिल्हा विस्तारित कार्यकारिणी संघटनात्मक बैठकीला मार्गदर्शन करतांना माजी खासदार यांनी बोलतांना म्हणाले भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा पक्षाचा कणा असून या कार्यकर्त्याच्याच भरोशावर विजयाचा संकल्प असतो.ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळ्यांना घेऊन गड किल्ले जिंकले. त्याचप्रमाणे भाजपाचा हा सुद्धा कार्यकर्ता हा मावळयाप्रमाणे पक्ष संघटनेची जबाबदारी स्वीकारून आगामी येणाऱ्या विधानसभेत विजयाचा संकल्प करुन काम करावे.जिल्यातील तिन्ही विधानसभा जिंकण्याचा निर्धार करावा. याकरिता सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी पुन्हा भाजपा संघटनेच्या कामाला लागावे.जरी आपला पराभव झाला असेल तरिपण कारणे न शोधता संघटनेच्या कामाला लागावे असा सल्ला देत न थांबता पुन्हा नव्याने जोमाने संघटनेच्या कामाला लागावे.असे मत माजी खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु. जनजाती मोर्चा चे अशोकजी नेते यांनी या जिल्हा विस्तारित कार्यकारिणी संघटनात्मक बैठकीला संबोधित केले.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही महिलांसाठी महत्वाकांक्षी योजना..
महिला भगिनींना या योजनेद्वारे महिलांचे सशक्तिकरण,महिला आत्मनिर्भर व्हावे,कुटुंबांचा उदरनिर्वाह करतांना येत असलेल्या अडीअडचणी यावर मात करुन जबाबदारी साभाळतांना महिलांना यात हातभार लागावा,महिलांचा सन्मान करण्याबरोबरच महत्त्वाकांक्षी ही योजना आहे.महिलांच्या खात्यात दर महिन्याला दीड हजार रुपये मिळणार याकरिता विरोधकांनी या योजनेचा विरोध करत महिलांची दिशाभूल केले.पण आता विरोधकच सुद्धा या योजनेचे फार्म भरतांना दिसत आहेत. लोकसभेच्या वेळेस विरोधकांनी महिलांच्या खात्यात दर महिन्याला साडेआठ हजार रुपये खटाखट खटाखट देऊ असं खोटं आश्वासन दिलं आता कुठे गेले.आले का महिला भगिनींच्या खात्यात साडेआठ हजार रुपये असा सवाल करत विरोधक काही खोटं नाट आरोप करून , मतदारांची दिशाभूल करतो. पण मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना महत्त्वाकांक्षी योजना असून ही योजना यशस्वी करण्यासाठी व या योजनेचा प्रत्येक महिला भगिनींना जास्तीत जास्त लाभ मिळावा. यासाठी जिल्ह्यात व विधानसभा निहाय अध्यक्ष व सदस्यांची निवड करण्यात आली आहे.
मी सुद्धा गडचिरोली व चामोर्शी येथे या योजनेचा शुभारंभ कार्यालय खोलुन महिला भगिनींना त्रास व धावपळ होऊ नये यासाठी कार्यालयात अनेक महिला भगिनींचे यशस्वीपणे फॉर्म भरण्यात आले. याचाही सुद्धा लाभ महिलांना मिळणार अशी ग्वाही देत मा.खा.अशोक जी नेते यांनी या जिल्हा विस्तारित कार्यकारिणी बैठकी मार्गदर्शन केले.

यावेळी बैठकीला मंचावर प्रामुख्याने विदर्भ संघटनमंत्री डॉ. उपेंद्र जी कोठेकर,विधानपरिषद चे आमदार प्रविणजी दटके, माजी खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु.जनजाती मोर्चा चे अशोक जी नेते,भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत जी वाघरे, आमदार डॉ. देवराव होळी, सहकार महर्षी नेते अरविंदजी सा.पोरेङ्डीवार, आमदार कृष्णाजी गजबे,ओबीसी आघाडी चे प्रदेश उपाध्यक्ष तथा भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाबुरावजी कोहळे,माजी आमदार डॉ.नामदेवराव उसेंडी,सहकार महर्षी प्रकाश सा.पोरेङ्डीवार, माजी जिल्हाध्यक्ष किसनजी नागदेवते, प्रदेश कार्यकारिणी सदस्य रविंद्र ओल्लालवार, किसान आघाडीचे प्रदेश सचिव रमेशजी भुरसे,‌लोकसभा समन्वयक प्रमोद जी पिपरे, जिल्हा महामंत्री प्रकाशजी गेडाम,जिल्हा महामंत्री गोविंद जी सारडा,जिल्हा महामंत्री सौ. योगिता पिपरे, जिल्हा महामंत्री सदानंद जी कुथे,जिल्हा उपाध्यक्ष तथा आदिवासी आघाडी चे जिल्हा प्रभारी अध्यक्ष डॉ. मिलिंद जी नरोटे, डॉ. नितीन कोडवते,डॉ. चंदाताई कोडवते,महिला मोर्चा च्या जिल्हाध्यक्षा गिताताई हिंगे, युवा मोर्चा चे जिल्हाध्यक्ष अनिल तिडके,अल्पसंख्याक आघाडी चे जिल्हाध्यक्ष बबलुभाई हुसैनी, अनु.जाती आघाडी चे जिल्हाध्यक्ष ॲड.उमेश वालदे, बंगाली आघाडी चे नेते दिपकजी हलदार,तसेच मोठ्या संख्येने भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.