देवेंद्र फडणवीस कोकण दौरा : तौक्ते चक्रीवादळाच्या नुकसानीची केली पाहणी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा कोकण दौरा सुरू असून आज दिनांक 19 मे रोजी रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांची भेट घेऊन रायगड जिल्ह्यातील वादळामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला.

अलिबाग येथील कोळीवाडा येथे भेट देऊन मच्छीमारांनी संवाद साधला.
तसेच नुकसान किती झाली याची माहिती घेतली.
अलिबाग तालुक्यातील खानाव उसळे येथील पिण्याच्या पाण्याची पडलेली टाकीची पाहणी केली. तसेच वावे या गावातील जमीनदोस्त झालेल्या घराची पाहणी देखील यावेळी फडणवीस यांनी केली.

या घरामध्ये डोक्यावर मार लागून एक गृहस्थ जखमी झाला असून त्यास नवी मुंबई येथे रुग्णालयात दाखल केले आहे. त्याबद्दल माहिती घेतली.

” शासनाने लवकरात लवकर मदत करावी. रायगड जिल्ह्यातील नागरिकांचे मोठ्या प्रमनात नुकसान झाले असून त्यामुळे त्यांना आर्थिक मदत सरकार जाहीर करावी. मच्छिमारांचे मोठे नुकसान झाले असून त्यांच्या बोटिंचे देखील नुकसान झाले आहे. .ज्यांची घरे पडली आहेत, फळबागांचे नुकसान झाले आहे त्यांच्यासाठी आर्थिक पॅकेज जाहीर करावे. असे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

यावेळी विरोधी विधान परिषद नेते प्रवीण दरेकर, आमदार रवींद्र चव्हाण, प्रशांत ठाकूर, महेश बालदी व इतर अनेक भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.

हे देखील वाचा : 

सामाजिक संस्थांच्या सहकार्यामुळे कोविडविरोधी लढ्याला मोठी ताकद – उपमुख्यमंत्री अजित पवार

राज्यातील वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा आता दहा जून पासून घेण्यात येणार

devendra fadnavislead story