- साठवणूक करणाऱ्या तीन आरोपींवर गुन्हा दाखल
अमरावती, दि. ०१ जानेवारी: अमरावती जिल्ह्यामधील अवैधरीत्या गुटखा विक्रीस प्रतिबंध घालण्याचे अनुषंगाने ३१ डिसेंबर २०२० च्या मध्यरात्री मिळालेल्या गुप्तबातमी वरून पोलीस अधीक्षक साहेब अम.ग्रा.यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधीक्षक निकेतन ब. कदम, पो,स्टे. धारणी यांनी पो.स्टे. धारणी येथील अधिकारी व कर्मचारी यांचे विशेष पथक तयार करून दि. ३१ डिसेंबर चे मध्यरात्री धारणी येथील किराणा व्यावसायिक मोहम्मद शरीफ अब्दुल हबीब रा. धारणी(आसिफ ट्रेडर्स), ललीत उर्फ लीलाधर पुनमचंद मालवीय रा. धारणी व हुकूमचंद राजाराम मालवीय रा. राणीतंबोली (राज किराणा) यांचे गोडाऊनवर छापे टाकून झडती घेतली असता ६,६०,९०४ रुपयाचा प्रतिबंधित असलेला गुटखा, सुगंधीत पान मसाला व सुगंधीत तंबाखूचा माल अवैधरीत्या साठवून ठेवलेला मिळून आला. तो मुद्देमाल जप्त करून तीन इसमाविरुद्ध पोलीस स्टेशन धारणी येथे कलम १८८, २६९, २७२,२७३ भा.द.वि नुसार गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास धारणी पोलीस करीत आहे.