पंजाबराव देशमुख यांच्या 122 व्या जयंती निमित्य अमरावती मध्ये दीपोत्सव, आकर्षक रोशनाई

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

अमरावती, दि. २८ डिसेंबर: स्वतंत्र भारताचे पहिले कृषि मंत्री, कृषि महर्षि भाऊसाहेब उपाख्य पंजाबराव देशमुख यांची 122 वी जंयती कोरोनाच्या काळात अतिशय साध्यापनाने साजरी करण्यात आली. पंजाबराव देशमुख यांचे विचार दिव्याच्या ज्योति प्रमाणे पज्वलित राहण्यासाठी अमरावती येथील त्यांच्या पहिल्या शाळेत दीपोत्सव साजरा करण्यात आला.

भारताच्या कृषि क्षेत्रात व शिक्षण क्षेत्रात प्रगतीसाठी त्यांचा मोठा सहभाग होता, गरीबाची, बहुजनाची मूल शिकावी म्हणून त्यांनी शिक्षण संस्थेची स्थापना केली होती, यावर्षी हजारों पणत्या लावत भाउसहेबांचा जयंती उत्सव साध्या प्रमाणे साजरा करण्यात आला, दरवर्षी हजारों लोक या दिवशी पंजबराव देशमुख यांच्या जयंती निमित्य एकत्रित जमतात मात्र यावेळी शिक्षकांच्या व संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा साजरा करण्यात आला होता. यावेळी पंजबराव देशमुख यांच्या स्मृति स्थळावर आकर्षक रोशनाई करण्यात आली होती.