लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
आलापल्ली दि.२८ जुलै : भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार दि ,२७ आणि २८ जुलै ला येलो अलर्ट जाहीर केले होते .आणि तो अंदाज अचूक ठरला असून आज सकाळी ५:00 वाजतापासून आलापल्ली भागात वादळीवारा , विजेचा कडकडातासह मुसलदार चार ते पाच तास एकसारखा होता त्यामुळे आलापल्ली, मोदुमडगु, नागेपल्ली परिसरात संपूर्ण जलमय परिस्थिती निर्माण झाल्याने अनेकांच्या घरात ,दारात पाणी पोहचले .त्यामुळे एकाच तारांबळ उडाली .
या घटनेची चाहूल लागताच स्वराज्य फाउंडेशनची संपूर्ण टीम क्षणाचा पण विलंब न करता राज्य नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन गडचिरोली तर्फे देण्यात आलेल्या नैसर्गिक आपत्ती बचाव कार्य साहित्य घेऊन मोदुमडगु येथील पूरग्रस्तांच्या मदतीला पोहचून कठीण परिस्थिती पूरग्रस्तांना मदत केल्याने स्वराज्य फाउंडेशनचे स्थानिक पूरग्रस्तांनी आभार मानले .
हे देखील वाचा ,
गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्रातील नवीन मतदारांनी मतदार नोंदणी करावी :- खासदार अशोक