तृतीय पंथीयांना प्रथमच आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

पालघर 18 ऑक्टोबर :-  १३ ऑक्टोबर हा दिवस जगभरात जागतिक आपत्ती धोके निवारण दिवस म्हणून साजरा केला जातो. त्याअनुषंगाने जनजागृती करण्यासाठी विविध कार्यक्रम घेतले जातात. जागतिक आपत्ती धोके निवारण दिवसाच्या अनुषंगाने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण पालघर मार्फत जिल्हाधिकारी कार्यालयात तृतीय पंथी व्यक्तींसाठी आपत्ती व्यवस्थापनाचे दिनांक १४
ऑक्टोंबर २०२२ रोजी प्रशिक्षण पार पडले.

समाजापासून दुर्लक्षित असलेल्या तृतीयपंथीय घटक समाजापासून अलिप्त राहूनसुद्धा जीवन जगू शकतो परंतू त्यांचेवर आलेल्या आपत्ती समयी समाजातील व्यक्ती त्यांना मदत करण्यासाठी सरसावत नाहीत. या समुदायांसाठी भारतात पहिल्यांदाच आपत्ती व्यवस्थापनावर प्रशिक्षण घेण्यात आले. लिंगावर आधारीत बरेच प्रशिक्षण होतात. पण ते फक्त महिलांसाठीच होत असतात. एखादा तृतीयपंथी हा अपघातग्रस्त झाला असल्यास त्यांना मदत करण्यासाठी त्यांच्याच समुदायातील लोकांनी येऊन मदत करावी लागते कारण सर्वसाधारण समुदाय हा त्यांना मदत करण्यास जात नाही. परंतू तृतीयपंथी व्यक्ती असा विचार करत नाहीत. हा दृष्टीकोण डोळ्यासमार ठेऊन सदरच्या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आलेले होते.

या प्रशिक्षणात आपत्ती व्यवस्थापनाची तोंड ओळख, प्रथमोपचार, रुग्ण उचल व हाताळणी पध्दती याबाबत प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षक भूपेंद्र मिश्रा आणि पुजा सिंग यांनी प्रशिक्षण दिले. जिल्हाधिकारी श्री. गोविंद बोडके आणि निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. किरण महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विवेकानंद कदम प्राधिकरणा मार्फत या नवकल्पनेतून तृतीयपंथी समाजात आपत्ती व्यवस्थापनाविषयी जनतागृती निर्माण करण्याचे काम करण्यास जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने सुरुवात केली आहे.

हे पण वाचा :-