महिला व पुरूष क्रिकेटपटूंचा भेदभाव संपणार

बीसीसीआयने केली मोठी ऐतिहासिक घोषणा
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई,  27, ऑक्टोबर :- जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड बीसीसीआय ने एक मोठी ऐतिहासिक घोषणा केली आहे. भारतीय महिला क्रिकेटपटूंना आता पुरूष क्रिकेटपटू इतकीच मॅच फी देणार असल्याने आता महिला व पुरूष क्रिकेटपटूंचा भेदभाव संपणार आहे. महिला क्रिकेटपटूंना आता पुरूष क्रिकेटपटूं इतकेच पैसे मिळणार आहेत. दोघांची मॅच फी ची रक्कम समान असणार आहे.

बीसीआयचे सचिव जय शाह यांनी व्टिट करून या ऐतिहासिक निर्णयाची घोषणा केली. आता महिला क्रिकेटपटूंना ही पुरूष क्रिकेटपटूं इतकीच मॅच फी मिळेल अस म्हटले आहे. स्मृती मांधला, हरमनप्रीत कौर या खेळाडूची मॅच फी रोहित शर्मा आणि विराट कोहली इतकीच असेल. या निर्णयानंतर आता महिला क्रिकेटपटूंना प्रत्येक टेस्ट मॅचसाठी 15 लाख रूपये मिळतील. एका वनडे साठी महिला क्रिकेटपटूंना 6 लाख आणि एका टी 20 मॅचसाठी 3 लाख रूपये मिळतील.

बर्याच काळापासून पुरूष आणि महिला क्रिकेटपटूंना समान पैसे देण्याची मागणी सुरू होती. बीसीसीआयने ही मागणी आता मान्य केली आहे. बीसीसीआयचा हा ऐतिहासिक निर्णय आहे. जय शाह यांनी आपल्या निर्णयाची माहिती देतांना सांगितले कि, मला सांगतांना आनंद होतोय, बीसीसीआयचे भेदभाव विरोधात हे महत्वपूर्ण पाउल आहे. काॅन्ट्रॅक्ट वर असलेल्या खेळाडूंचे आम्ही समान वेतन करतोय. आता यापुढे प्रत्येक सामन्यात पुरूष आणि महिला क्रिकेटपटूंना समान फी मिळेल.

हे देखील वाचा :-

BCCIIndia