जि. प. अध्यक्ष्यांचा हस्ते ग्रामीण क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. ४ एप्रिल: अहेरी तालुक्यातील पेठा येथे फ्रेंड्स ११ सी.सी.पेठा क्रिकेट क्लब तर्फे भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आले.

सदर क्रिडा स्पर्धेसाठी पहिला पारितोषिक अजय कंकडालवार तर दूसरा व तिसरा असे तीन पुरस्कार या ठिकाणी देण्यात येणार आहे.

यावेळी मंचावर माजी प.स.सभापती सुरेखा आलाम, सरपंच शांता सिडाम, उपसरपंच नितेश मूलकरी डॉ. सुंदर नैताम, अमीन खान, शिवराम पुल्लूरी, देचली सरपंच दिवाकर मडावी, माजी सरपंच सत्यम वेलादी, भीमाराव मडावी, ईश्वर कोठा, जयराम आत्राम, सत्यम नीलम, शनकर शेगम, नैकुलवार काका, रामय्या, सदस्य सुमन ताई वेलादी, दागम काका, श्रीनिवास कांबडे, नागेश पोरतेट,  तुळशीराम कोडापे, महेश तेलाम, विनोद कुमरे, दिवाकर आलाम उपस्थिति होते.       

       यावेळी मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, गावातील महिला व प्रतिष्ठीत नागरिक उपस्थित होते.

zp ajay kankadalwar