अहेरी येथील रोल च्या वतीने अंगणवाडी सेविकांना शेवगा रोपांचे वाटप व माहिती

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

अहेरी, दि. १४ जानेवारी: रोल संस्थेच्या वतीने अहेरी सर्कल मधील अंगणवाडी सेविकांना शेवगा रोपे देण्यात आली. दि रिसर्च ऑर्गनायझेशन फॉर लिव्हिंग एन्हान्समेंट, अहेरी अर्थात रोल ह्या संस्थेतर्फे वनोषधी प्रशिक्षण केंद्रात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी प्रिती सुरेश डंबोळे यांनी शेवगा वनस्पती बद्दल उपस्थित अंगणवाडी सेविकांना माहिती दिली .

शेवगा (शास्त्रीय नाव: Moringa oleifera, मॉरिंगा ऑलिफेरा ; इंग्लिश: Drumstick, ड्रमस्टिक 😉 ही मॉरिंगेशिए कुळातल्या मॉरिंगा प्रजातीतील सर्वाधिक आढळणाऱ्या जातीची वनस्पती असून उष्ण कटिबंधीय व समशीतोष्ण कटिबंधीय प्रदेशांत आढळणारा हा वृक्ष १० मी. उंचीपर्यंत वाढतो. याच्या फुले, पाने तसेच शेंगांचा पाककृती बनवण्यासाठी वापर होतो.याला विदर्भातील झाडीप्रांतात मुंगना असं म्हणतात.आयुर्वेदामध्ये 300 रोगांवर शेवग्याने उपचार केले जाऊ शकतात असे सांगण्यात आले आहे. शेवग्यात कार्बोहायड्रेट, प्रोटीन, कॅल्शिअम, पोटॅशिअम, आयर्न, मॅग्नेशिअम, व्हिटॅमिन ए, सी आणि बी कॉम्पलॅक्स भरपूर प्रमाणात आढळून येते.शेवग्याच्या पानांची भाजी करतात. लोणच्यात, सॅलेडमध्ये, सूप करण्यासाठी त्याचा वापर करतात.असे अनेकविध उपयोग आहेत.

यावेळी झालेल्या कार्यक्रमा बालविकास प्रकल्प अधिकारी भाऊसाहेब गडदे, विस्तार अधिकारी व्ही.एम.कुरिवार,पर्यवेक्षिका महागाव सर्कल यांची उपस्थिती होती.

ROLEप्रिती सुरेश डंबोळे