लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
अहेरी, दि. २६ जून : राजे धर्मराव हाॅयस्कूल वेलगूर ता. अहेरी येथे आज दिनांक २६ जून २०२१ रोजी सामाजिक न्यायदिन साजरा करण्यात आला तसेच मानव विकास मिशन अंतर्गत बाहेर गावावरुन ये-जा करणाऱ्या ४१ मुलींना मोफत सायकलींचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमच्या वेळी वेलगूरचे माजी सरपंच कुसुमताई दुधी, शाळा व्यवस्थापन समितीचे रसिकाताई रामटेके, मंगलाताई दहागावकर तसेच मुख्याध्यापक कविराजवार , कुंडू, दंडारे, गरमडे, महेशकर, कविराजवार आदी ची उपस्थिती होती .
या प्रसंगी मुख्याध्यापकांनी राजर्षी शाहु महाराज यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. तसेच विद्यार्थ्याना सायकलचे महत्व सांगितले व मुलींना दररोज शाळेत येण्याचे आवाहन केले.
हे देखील वाचा :
राजर्षि शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त गडचिरोली जिल्हा प्रशासनाकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन