राणी दुर्गावती विद्यालय आलापल्ली येथील मुलींना सायकलीचे वाटप

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

आलापल्ली : राणी दुर्गावती विद्यालय आलापल्ली ता. अहेरी येथे मानव विकास मिशन अंतर्गत मुलींच्या शाळेतील गळती थांबवून जवळपासच्या मुलींना शाळेत जाण्या-येण्यासाठी ५ कि.मी. अंतरातील २७ मुलींना सायकल वितरित करण्यात आल्या.

गावात शिक्षणाची सोय नसल्यामुळे परिसरातील मुली शिक्षणापासून वंचित राहू नये. त्यांनाही समान शिक्षणाचा लाभ मिळावा व प्रत्येक क्षेत्रात मुली पुढे जावे. असे मत याप्रसंगी आलापल्ली गावचे प्रथम नागरिक शंकर आत्राम यांनी व्यक्त केले.

शाळेचे मुख्याध्यापक गजानन लोनबोले यांनी मिळालेल्या सवलतीचा चांगला उपयोग करून दर्जेदार शिक्षण घेऊन आपले ध्येय गाठावे. असे मार्गदर्शन केले.

याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष भीमराव आत्राम आलापल्ली ग्रामपंचायतचे सरपंच शंकर मेश्राम, नागेपल्ली ग्रामपंचायतचे सरपंच लक्ष्मी कोडापे, सदस्य सोमेश्वर रामटेके बोलूनार, पालक, सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

हे देखील वाचा : 

धक्कादायक! जन्मदात्या बापानेच तीन मुलांच्या आईस्क्रिममध्ये मिसळवलं विष, एकाचा मृत्यू

राज्यपालांनी पाठवले ठाकरे सरकारला पत्र, मुख्यमंत्र्यांना करून दिले स्मरण

धक्कादायक!! एकाच महिलेला एकाच वेळी दिले कोरोना लसीचे तीन डोस!

 

lead storyLonbale SirRani Durgawati High SchoolShankar Meshram