भाजपच्या वतीने गोकुलनगरात जीवनावश्यक वस्तूचे वाटप

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. २४ मे: भारतीय जनता पार्टी गडचिरोली शहर व झोपडपट्टी आघाडीच्या वतीने कोविड या महामारीच्या काळात हाताला काम नसल्याने गरीब नागरिक हलाखीचे जीवन जगत आहेत त्यांना काही प्रमाणात आधार मिळावा यासाठी त्यांना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी नगर परिषदेचे उपाध्यक्ष तथा आरोग्य सभापती अनिल कुणघाडकर,  झोपडपट्टी आघाडी चे श्यामजी वाढई, शहर महामंत्री विनोद देवोजवार यांच्या हस्ते गोकुल नगरातील वार्ड क्र. २२ मधील गरीब कुटूंबांना जीवनावश्यक वस्तूंच्या किट चे वाटप करण्यात आले.

कोविडच्या या परिस्थितीत सर्वत्र लॉकडाऊन असल्याने गरीब, कामगार, मजूर वर्ग आर्थिक हतबल झालेला आहे. त्यातच ११ वाजेपर्यंत बाजारपेठ सुरू राहात असल्याने किरकोळ व्यावसायिक, लहान-मोठे व्यवसाय करणारे तसेच टपरीवर बसून दुकान चालविणारे व अन्य कोणत्याही मजुरी कामावर जाणारे कामगार यांना सद्यस्थितीत रोजगार नसल्याने ते हवालदार झाले आहेत. व त्यांच्यासमोर परिवाराच्या उदरनिर्वाहचा प्रश्न निर्माण झाला आहे. या त्यांच्या अडचणीत त्यांना थोडी मदत व्हावी म्हणून भारतीय जनता पार्टी झोपडपट्टी आघाडी च्या वतीने त्यांना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले. यात तांदूळ, डाळ, खाद्यतेल, साखर, पत्ती, तिखट- मीठ व अन्य वस्तूंचा समावेश आहे.

याप्रसंगी झोपडपट्टी आघाडी चे पदाधिकारी, कार्यकर्ते व वार्डातील नागरिक उपस्थित होते.

हे देखील वाचा :

बनावट लग्न लावून पैसे उकळणारी टोळी गजाआड

दिलासादायक! भारतात लहान मुलांवरील ‘या’ महिन्यापासून कोव्हॅक्सिन लसीच्या ट्रायलला सुरुवात

ashok neteBJP Gaedchirolilead story