कोरोना योद्धांना स्व:खर्चातून मास्क-सॅनिटायजरचे वाटप

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

अहेरी, दि. ६ मे : महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला असून कोव्हिड-१९ रुग्णांची संख्या कमी होण्याचं नाव घेत नाहीये. राज्य सरकार जनतेच्या हितासाठी आणि कोरोनाचा प्रादुर्भाव कमी व्हावा यासाठी शर्तीचे प्रयत्न करीत असून सुद्धा दररोज ५० हजाराहून अधिक नवे रुग्ण आढळून येत आहेत. राज्यात ‘ब्रेक दि चेन’ आणि लॉकडाऊन सारखे कडक निर्बंध असून सुद्धा कोरोना संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसून येत नाही.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शक सूचनांचे पालन करतांना पोलीस खात्यातील अधिकारी-कर्मचारी लोकांच्या संपर्कात येतात आणि पोलीस खात्यातील कित्तेक अधिकारी-कर्मचारी कोरोना संक्रमित होतात. तसेच कित्तेक कोरोना योद्धांना आपलं जीव सुद्धा गमावा लागला तर कर्तव्य बजावत असतांना आपल्यामुळे आपल्या कुटुंबाना हा संसर्ग होऊ नये म्हणुन आपल्याच कुटुंबियांपासून त्यांना दूर रहावे लागते. त्याच धर्तीवर “आपले रक्षण करणाऱ्यांचे रक्षण कोण करणार” याच भावनेतून सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार स्वप्नील तावाडे यांच्या वतीने अहेरी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पोलीस अधिकारी-कर्मचारी यांना मास्क आणि सॅनिटायजरचे वितरण करण्यात आले.

हे देखील वाचा : 

कोमट पाणी, असं बहुगुणी…

विनाकारण बाहेर फिरणाऱ्या नागरिकांची पोलीस प्रशासनाकडून होणार कोरोना चाचणी

 

lead storySapnil Tawade