छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्मोत्सवा निमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व शिवजन्मोत्सव समिती, अहेरी तर्फे मास्क व सॅनिटायझर वितरण

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

अहेरी : छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्मोत्सवा निमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व शिवजन्मोत्सव समिती, अहेरी तर्फे आहेरीतील कामगार लोक, गरजू व्यक्ती यांना मास्क व सॅनिटायझर वितरण करून जनजागृती करण्यात आली.

सध्याच्या परिस्थितीची लक्षात घेता अहेरीतील कामगार लोक, गरजू व्यक्ती यांना स्वयंसेवकांनी मास्क व सॅनिटायझर वितरण केले व याचा नियमित पणे योग्य वेळी वापर करा असे आव्हान केले. हा उपक्रम अहेरीच्या चारही वस्तीत राबवण्यात आला.

यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक व शिवजन्मोत्सव समितीचे सदस्य आदींची उपस्थिती होती.

हे देखील वाचा :

महिलांची प्रगती म्हणजे समाजाची प्रगती : भदंत डॉ. चंद्रकीर्ती

मुंबई उच्च न्यायालयात 40 जागांसाठी भरती

(WCL) वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड मध्ये स्टाफ नर्स च्या ५६ जागांसाठी भरती

 

Aherilead story