खा. अशोक नेते यांच्या वाढदिवसानिमित्य कोरोनामुळे विधवा झालेल्या महिलांना साडी व आर्थिक मदतीचे वाटप

खा. अशोक नेते यांच्या वाढदिवसानिमित्य कोरोनामुळे विधवा झालेल्या महिलांना साडी व आर्थिक मदतीचे वाटप गरजू व अपंगांना किराणा किटचे वाटप करण्यात आले.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. 2 जुलै : कोरोनाच्या काळात अनेक गरीब कामगार मजूर वर्गाचा रोजगार हिरावला तसेच कोरोना मुळे विधवा झालेल्या महिलांचे कुटुंब उघडयावर आले आहे या सर्वांना मी मदत करण्यासाठी सदैव तयार असून कोरोना काळात जनसामान्य नागरिकांना मदत करण्याची ग्वाही खा. अशोक नेते यांनी दिली.

खा.अशोकजी नेते यांच्या वाढदिवसानिमित्त “सेवा हि संघटन” उपक्रम या गडचिरोली येथील कार्यक्रमात ते बोलत होते.

खा. अशोक नेते, राष्ट्रीय महामंत्री, भाजपा STM, यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा हि संघटन या उपक्रमात गरीबांना अन्नधान्य वाटप,कोरोनात म्रुत्यु पावलेल्या कुटुंबीयांना मदत,विधवांना साळीचोळी वाटप,नाभीक समाजाला अन्नधान्य किट वाटप, व्रुक्षा रोपवन, ऐम्बुलंस वाटप, कोरोनात चांगले कार्य करणाऱ्या IAS,IPS,CS,DHO,यांचा सत्कार या विविध सेवा कार्याचे आयोजन करण्यात आले.

याप्रसंगी मंचावर खा. अशोक नेते, राष्ट्रीय महामंत्री, भाजपा STM, भाजपचे ज्येष्ठ नेते बाबुरावजी कोहळे, गडचिरोली च्या नगराध्यक्ष योगिताताई पिपरे, जिल्हा महामंत्री रवींद्र ओल्लालवार, जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे,प्रशांत वाघरे, जि प चे कृषी सभापती रमेशजी बारसागडे, जि. प. समाज कल्याण सभापती रंजीताताई कोडाप, अणीलजी कुनघाडकर, न. प. उपाध्यक्ष. नामदेव शेंडे, नाभीक समाज संघटना, गडचिरोली. किसान आघाडीचे प्रदेश सदस्य रमेशजी भुरसे, नानाभाउ नाकाडे, प्रदेश सदस्य, स्वप्नील वरघंटे, प्रदेश सदस्य, भाजयुमो, महाराष्ट्र. जिल्हा उपाध्यक्ष डॉ भारत खटी, महिला आघाडी च्या प्रदेश सदस्य रेखाताई डोळस,भाजयुमो जिल्हाध्यक्ष चांगदेवजी फाये, भाजपचे ज्येष्ठ नेते दामोधर अरगेला, विलास गांवडे, गडचिरोली तालुका संपर्क प्रमुख विलास पाटील भांडेकर, भाजयुमो चे जिल्हा महामंत्री संजय बारापात्रे, कुरखेडाचे नगर पंचायत चे माजी नगराध्यक्ष रवींद्र गोटेफोडे, श्याम वाडई, सागर कुमरे, शहर अध्यक्ष, भाजपा युवा मोर्चा, विनोदजी देवोजवार, शहर महामंत्री, पुष्पाताई करकाडे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

हे देखील वाचा :

तिवरे धरणग्रस्तांसाठीच्या २४ घरांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण; उर्वरीत घरांसाठी ७ कोटींचा निधी देणार

महाविकास आघाडीच्या नाकर्तेपणामूळे ओबीसींचे राजकीय आरक्षण धोक्यात – चंद्रशेखर बावनकुळे

पहा कुठे मिळाले गडचिरोली पोलीस दलास नक्षल्याविरोधात मोठे यश, काय हस्तगत करण्यात झाले सफल?

 

ashok netelead story