मां विश्वभारती संस्थेच्या वतीने आलापल्ली व नागेपल्ल्लीतील विलगिकरण कक्षातील रुग्णांना अल्पोहार वाटप

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क


अहेरी :
तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे आलापल्ली व नागेपल्लीतील ग्रामपंचायत प्रशासनाने पुढाकार घेउन गावातील शासकीय मुलांचे व मुलींच्या    वसतिगृहात विलगिकरण कक्ष तयार करून कोरोना बाधितांना ठेवण्यात आले आहेत.

मां विश्वभारती सेवा संस्थेच्या वतीने शासकीय मुलींचे वसतिगृह नागेपल्ली येथे महिला कोरोनाबाधितांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. तसेच शासकीय मुलांचे वसतिगृह आलापल्ली येथे पुरुषांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. या ठिकाणी संस्थेच्या वतीने चहा, नास्ता तसेच फळांचे वाटप करण्यात आले.

यावेळी आलापल्लीचे सरपंच शंकर मेश्राम, मां. विश्वभारती सेवा संस्थेचे अध्यक्ष चंद्रकिशोर पांडे, गंगाधर रंगू, जहांगीर शेख, अमोल कोलपाकवार, मिलिंद खोंड आदींची उपस्थिती होती.

हे देखील वाचा :

Big BREAKING :अनिल देशमुख यांच्याविरोधात आता ईडीने दाखल केला गुन्हा!

आंध्र प्रदेशमध्ये ऑक्सिजनअभावी 11 रुग्णांचा मृत्यू

 

Allapalli Qarantine Centerlead story