लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्ह्यात २०२५ या वर्षासाठी स्थानिक स्तरावरील सुट्ट्यांचा निर्णय जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी घेतला असून यंदा पोळा, घटस्थापना आणि नरक चतुर्दशी हे तीन सण जिल्ह्यातील स्थानिक सुट्या म्हणून राहणार आहेत.
या निर्णयानुसार पोळा शुक्रवार, २२ ऑगस्ट २०२५ रोजी, घटस्थापना सोमवार, २२ सप्टेंबर २०२५ रोजी आणि नरक चतुर्दशी सोमवार, २० ऑक्टोबर २०२५ रोजी स्थानिक सुट्टी म्हणून घोषित करण्यात आली आहे. या तीनही दिवशी जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांना सुट्टी राहणार असून संबंधित आदेश जिल्हा प्रशासनाने प्रसिद्ध केले आहेत.
महत्त्वाचे म्हणजे या स्थानिक सुट्ट्या गडचिरोली जिल्ह्यातील दिवाणी व फौजदारी न्यायालये तसेच सर्व राष्ट्रीयकृत व अनुसूचित बँकांना लागू होणार नाहीत, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे सरकारी कार्यालये व बहुतांश कर्मचारी वर्गाला या निर्णयाचा लाभ मिळणार असला तरी बँकिंग व न्यायालयीन कामकाज नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहे.