घरोघरी तिरंगा’ फडकावून ‘हर घर तिरंगा’ अभियानात सहभागी व्हा जिल्हाधिकारी संजय दैने यांचे नागरिकांना आवाहन

घरोघरी तिरंगा हे अभियान उत्साहाने साजरे करण्यात येत असून घरोघरी तिरंगा ही आता लोकचळवळ बनलेली आहे.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त मागील दोन वर्षापासून राज्यात हर घर तिरंगा म्हणजेच घरोघरी तिरंगा हे अभियान उत्साहाने साजरे करण्यात येत असून घरोघरी तिरंगा ही आता लोकचळवळ बनलेली आहे. यावर्षीदेखील जिल्ह्यातील नागरिकांनी 13 ते 15 ऑगस्टदरम्यान ‘घरोघरी तिरंगा’ फडकावून हर घर तिरंगा अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी संजय दैने यांनी केले आहे.

राज्यात 9 ते 15 ऑगस्ट या कालावधीत घरोघरी तिरंगा मोहिम राबविण्यात येत आहे. या कालावधीत गावपातळीपासून ते जिल्हापातळीपर्यंत तिरंगा रॅली, तिरंगा यात्रा, तिरंगा मॅरेथॉन, तिरंगा कॉन्सर्ट, तिरंगा कॅनव्हास, तिरंगा प्रतिज्ञा, तिरंगा सेल्फी, तिरंगा ट्रीब्यूट असे विविध उपक्रम नागरिकांच्या सहभागाने राबविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी दैने यांनी दिल्या आहेत.

 

‘घरोघरी तिरंगा’ फडकावून हर घर तिरंगा अभियानात सहभागी व्हा..गडचिरोलीघरोघरी तिरंगा ही आता लोकचळवळजिल्हाधिकारी संजय दैने