लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली: आगामी पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार नोंदणी प्रक्रियेला गती देण्यासाठी गडचिरोली येथे जिल्हास्तरीय आढावा बैठक आयोजित करण्यात आली. बैठक आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या कर्तव्यदक्ष कार्यालयात पार पडली.
या बैठकीचे नेतृत्व माजी खासदार आणि भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांनी केले, तर बैठक प्रमुख उपस्थितीने सुधिर जी दिवे यांनी मार्गदर्शन केले.
बैठकीदरम्यान पदवीधर मतदार नोंदणीची सद्यस्थिती, जागरूकता मोहिमांचा आढावा, मतदार याद्यांतील नावनोंदणीसाठी केलेली संघटनात्मक तयारी यावर सविस्तर चर्चा झाली. आगामी निवडणुकीत पदवीधर वर्गाचा जास्तीत जास्त सहभाग सुनिश्चित करण्यासाठी प्रभावी नियोजन यावेळी ठरवले गेले.
या कार्यक्रमास माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, जिल्हा सचिव गोविंद सारडा, गीता हिंगे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य रविंद्र ओल्लालवार, कि.मो. जिल्हाध्यक्ष विलासजी भांडेकर, जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश दता, महेश झरकर आणि इतर विविध पदाधिकारी उपस्थित होते.