विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी १६ ऑगस्टला गडचिरोलीत मतदार नोंदणीचा घेणार आढावा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली – निवडणूक आयोगाने १ जुलै या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्रासह मतदार यादीचा दुसरा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांना मतदार यादी निरीक्षक म्हणून नियुक्त केले आहे. त्या शुक्रवार दिनांक १६ ऑगस्ट रोजी गडचिरोली जिल्ह्याला भेट देवून मतदार नोंदणीचा आढावा घेणार आहेत.

विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाच्या कालावधीत मतदार यादी निरीक्षक यांना जिल्हा निहाय एकुण तीन भेटी द्यावयाच्या आहेत. त्याअनुषंगाने मतदार यादी निरीक्षक तथा विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी 16 ऑगस्ट 2024 रोजी गडचिरोली जिल्ह्यात पहिली भेट देणार आहेत. सदरचे भेटी दरम्यान जिल्ह्यातील खासदार, आमदार आणि मान्यताप्राप्त राजकीय पक्षांकडून त्यांचे अभिप्राय, सूचना स्विकारणार असून मतदार नोंदणी अधिकारी यांचेकडून मतदार नोंदणी बाबत दुपारी 4.45 वाजता आढावा घेणार आहेत, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय दैने यांनी कळविले आहे.

अंतराळ संशोधन क्षेत्रातील तंत्रज्ञानाचा लाभ मच्छिमारांना होणार -डॉ. अतुल पाटणे

जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय दैनेविभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी