‘आनंदाचा शिधा’ वाटप करून दिवाळी भेट दिली – आम. डॉ देवराव होळी  

सर्वसामान्य, गरिबांच्या दिवाळीला जनकल्याणकारी सरकारची गोड भेट, १०० रुपयांमध्ये १ किलो तेल, १ किलो रवा, १ किलो डाळ, १ किलो साखरेचे 'आनंदाच्या शिधा' मधून वाटप
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली, 22 ऑक्टोबर :-  केंद्र व राज्यात असलेल्या सरकारने जनकल्याणाच्या विविध योजना हाती घेतल्या असून या दिवाळीला गरिबांच्या मदतीला राज्य सरकारने सरकारी स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून १०० रुपयांमध्ये १ किलो तेल, १ किलो रवा, १ किलो डाळ, १ किलो साखर हा आनंदाचा शिधा वाटप करून दिवाळी भेट दिली असल्याचे प्रतिपादन आमदार डॉ  देवराव होळी यांनी या आनंदाचा शिधा वाटप करताना केले. यावेळी त्यांनी अनखोडा कोनसरी, यासह चामोर्शी तालुक्यातील गावातील रेशन दुकानांमध्ये जाऊन आनंदाच्या शिधाची बॅग लाभार्थ्यांच्या हाती सोपविली.

याप्रसंगी तालुकाध्यक्ष दिलीपजी चलाख, माजी जिल्हा परिषद सदस्य धर्मप्रकाशजी कुकुडकर, अनखोड्याचे उपसरपंच वसंतजी चौधरी, वतिश सहारे, कोनसरीचे बंडूभाऊ बारसागडे आष्टीचे प्रकाशजी बोबाटे, यांच्यासह भाजपाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते गावातील नागरिक तसेच लाभार्थी प्रामुख्याने उपस्थित होते

मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील भाजपा शिवसेना महायुती सरकारने राज्यातील गरिबांना दिवाळीनिमित्त १०० रुपयांमध्ये १ किलो तेल, १ किलो रवा, १ किलो डाळ, १ किलो साखर हा आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय घेतला. आज दिवाळीपूर्वी आनंदाचा शिधा वाटप करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली असून आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी स्वतः राशन दुकानांमध्ये जाऊन तसेच प्रत्यक्ष लाभार्थ्याच्या घरी जाऊन या आनंदाच्या शिधाच्या बॅग चे वितरण लाभार्थ्यांना केले.

हे पण वाचा :-

भोसरी एमआयडीसी भूखंड घोटाळ्याची होणार पुन्हा चौकशी

परभणीत मोठ्या सरकारी पदांवर महिलांची नियुक्ती

distributingDiwali gift