आदिवासी संस्कृती व इतिहासाचे भविष्यासाठी दस्तऐवजीकरण: एक महत्त्वाचे पाऊल

डॉ.विवेक जोशी: “आदिवासी संस्कृती, इतिहास संवर्धन व दस्तऐवजीकरण” विषयावर विद्यार्थी कार्यशाळा आयोजन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

भामरागड: आदिवासी समाज हा सांस्कृतिक वारशाला महत्व देणारा आणि मौखिक साहित्याच्या माध्यमातून आपल्या परंपरांचे आणि इतिहासाचे संवर्धन करणारा समाज आहे. आदिवासी लोकांमध्ये एक अत्यंत प्रभावी मौखिक साहित्याची परंपरा असुन, ती, त्यांची सांस्कृतिक ओळख, पारंपरिक ज्ञान आणि जीवनशैली जतन करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.

आदिवासी लोकांचे मौखिक साहित्य हे मुख्यतः कथा, गीतं स्वरुपात अस्तित्वात आहे. हे साहित्य एक जिवंत इतिहास आहे, जो पुढच्या पिढ्यांना त्यांचं सांस्कृतिक धरोहर व वारशा टिकविण्यासाठी महत्त्वपूर्ण भुमिका बजावणार आहे. तंत्रज्ञानाच्या युगात आदिवासी लोकसमूहाने आपल्या मौखिक साहित्याची जपणूक व संवर्धन करण्यासाठी विविध डिजिटल प्लॅटफॉर्म्सचा वापर करून आदिवासी पारंपारिक ज्ञान, इतिहास संवर्ध, भाषा आणि जीवन पद्धतीचे जतन पुढील पिढी करिता करणे हि भविष्याची गरज आहे व यासाठी अश्या कार्यशाळा हे एक महत्वाचे पाउल राहणार असे प्रतिपादन डॉ.विवेक जोशी यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणुन १९ मार्च २०२५ रोजी आदिवासी अध्यासन केंद्र, इंग्रजी विभाग व राजे विश्वेशराव कला व वाणिज्य महाविद्यालय, भामरागड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विद्यार्थी कार्यशाळेच्या ऊदघाटन सत्रात केले.

कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी बोलताना डॉ.हेमराज लाड, मा. प्राचार्य यांनी भामरागड सारख्या महाराष्ट्रातील आदिवासी तालुका येथे माडिया भाषा संवर्धन व सास्कृतिक परंपराचे जतन करण्याप्रती महाविध्यालयीन विध्यार्थ्यानी पुढाकार घ्यावा व महत्व समाजापर्यंत पोहचविण्याकरिता मोलाची भुमिका पार पाडावी व संशोधनावर आधारित दस्तऐवजीकरण करावे जेणेकरून पुढच्या पिढी करिता दस्तऐवजीकरण ठेवा जपून ठेवता येणार असे आवाहन केले. प्रमुख उपस्थिती म्हणुन  दादाजी कुरसाम, आदिवासी कवी उपस्थित होते त्यांनी आदिवासी कविता व विषय सादरीकरण कसे असावे संदर्भात मार्गदर्शन केले. आदिवासी अध्यासन केंद्रातील दस्तऐवजीकरण संदर्भातील संधी व आदिवासी अध्यासन केंद्र अंतर्गत उपक्रमाची माहिती प्रास्तविका मध्ये डॉ. वैभव मसराम, समन्वयक, आदिवासी अध्यासन केंद्र, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली यांनी केले.

विद्यार्थी कार्यशाळा अंतर्गत “उत्कृष्ट दस्तऐवजीकरण विद्यार्थी स्पर्धा” लोक कथा, डाक्युमेंट्री, संशोधन पेपर अंतर्गत पुरस्कार रोहिनी पुंगाटी, कीरन कुरसामी,निकीता सोमनकर या विध्यार्थ्यांना देण्यात आले. महाविद्यालय कार्यशाळा समन्वयक डॉ.एस. डोहने, समाजशास्त्र विभाग, यांनी यशस्वी आयोजनात मोलाची भुमिका बजावली व आभार प्रदर्शन प्रा.चालूरकर यांनी केले तसेच सर्व प्राध्यापक वृंद व विद्यार्थी बहुसंख्येने कार्यशाळेस उपस्थित होते.