३१ डिसेंबरला दारू पिऊ नका… !

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

गडचिरोली :  येत्या दोन दिवसात नवीन वर्षाची सुरुवात होणार  असून नवीन वर्षाचे स्वागत आनंदात करून  मावळत्या वर्षाला निरोप देण्याचा दिवस असतो हा क्षण अविस्मरणीय असतो त्यांचे आनंदात स्वागत  करा.

नविन वर्षाचे स्वागत हा जुन्या व नव्या वळणाचा अविस्मरणीय क्षण असतो  यासाठी सर्वत्र जय्यत तयारी सुरू आहे. अनेक जण थर्टी फर्स्ट साजरा करून नवीन वर्षाचे स्वागत करताना दारुच्या नशेत असतात. मात्र, कुणीही  दारू पिऊन नवीन वर्षाचे स्वागत करू नये. नवीन वर्षाचे स्वागत हे आनंदातव  नव्या संकल्पासह  सुरुवात करायची असते. परंतु तरुण वर्ग  ३१ डिसेंबरलाच अनेक युवक निमित्त साधून दारूचा पहिला घोट घेतात. त्यामध्ये अनेक प्रौढ व्यक्ती सुद्धा यात सामील असतात.  सगळे बेभान होऊन नववर्षाचे स्वागत करतात.

नववर्षाचे स्वागत हे आनंदाने व नव्या संकल्पासह नवीन वर्षाची सुरुवात  करून येणाऱ्या संपूर्ण वर्ष खराब करू नये.  नवीन वर्षात थोडीशी गम्मत म्हणून घेतलेली दारू हळूहळू संपूर्ण शरीराचा ताबा घेते. यातूनच सध्या सार्वत्रिक दिसत असलेल्या हिंसा, अत्याचार, अपघात अशा घटना जन्म घेत आहेत. त्यामुळे  दारूच्या पहिल्या घोटापासून युवांनी आणि इतर सर्वांनी दूर राहवे. नशेत बेभान होऊन कुणीही नव वर्षाचे स्वागत करू नये.

हे देखील वाचा,

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना मिळणार नामंकित इंग्रजी माध्यमांच्या निवासी शाळांमध्ये प्रवेश

 

आलापल्ली शहरात अमित शहा यांच्या वक्तव्याचे तीव्र पडसाद..

लवकरच काँग्रेस पक्षामध्ये होणार मोठे फेरबदल ;

 

थोडीशी गम्मत म्हणून घेतलेली दारू हळूहळू संपूर्ण शरीराचा ताबा घेतेदारू पिऊन नवीन वर्षाचे स्वागत करू नये.दोन दिवसात नवीन वर्षाची सुरुवात होणारनविन वर्षाचे स्वागत हा जुन्या व नव्या वळणाचा अविस्मरणीय क्षण असतो